Sharad Pawar News : बंडानंतर अजित पवारांनी सतत व्यक्त केली 'ती' खदखद, आता शरद पवारांनी सगळंच काढलं

Sharad Pawar On Prafull Patel : शरद पवारांनी 2004 पासूनच प्रफुल्ल पटेल भाजपबरोबर जाण्यासाठी आग्रही असल्याचं सांगितलं आहे.
ajit pawar sharad pawar
ajit pawar sharad pawarsarkarnama
Published on
Updated on

Mumbai News, 19 May : दिनांक 2 जुलै 2023. अजित पवार यांनी काही आमदारांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ( Ncp ) बंड केलं. अजित पवारांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा देत मंत्रिपदाची शपथ घेतली. राष्ट्रवादीत पडलेल्या उभ्या फुटीनंतर सुप्रिया सुळे यांना राष्ट्रीय अध्यक्ष करणे आणि पक्षात काम करून दिले जात नसल्याच्या मुद्द्यावरून अजित पवारांनी वेळोवेळी आपली नाराजी व्यक्त केली आहे. तसेच, 'आम्ही कुणाच्या पोटी जन्माला आलो नाही, ही आमची चूक आहे का?' अशी खदखद अजित पवारांनी सतत व्यक्त केली आहे. दुसरीकडे सुप्रिया सुळे खासदारकी सोडून कोणतं पद दिलं? अजित पवारांना वजनदार मंत्रिपदे देण्यात आली, असा दावा शरद पवार गटाकडून केला जातो.

यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे ( शरदचंद्र पवार ) अध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar ) यांनी भाष्य करत अजित पवार ( Ajit Pawar ) यांना फटकारलं आहे. "अजित पवार यांना उपमुख्यमंत्रिपद, मंत्रिपद, विरोधी पक्षनेतेपद, अशी विविध पदे दिली. एवढं सारं होऊनही पक्षात मला काम करण्यास संधी मिळाली नाही, ही अजित पवारांनी ओरड निरर्थक आहे," अशा शब्दांत शरद पवारांनी सुनावलं आहे. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत शरद पवार बोलत होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शरद पवार म्हणाले, "कुटुंबप्रमुख म्हणून सुप्रिया सुळे ( Supriya Sule ) आणि पुतण्या अजित पवार यांच्यात कधीही भेद केला नाही. सुप्रिया सुळे यांना राष्ट्रीय राजकारणात आणि अजित पवार यांना राज्याच्या राजकारणात जबाबदारी देण्याचा प्रस्ताव प्रफुल पटेल यांनी दिला होता, पण मी तो स्वीकारला नाही, या म्हणण्यात तथ्य नाही. सुप्रिया यांना फक्त खासदारकी दिली असून त्या लोकसभेतील पक्षाच्या गटनेता आहेत आणि आतापर्यंत दिल्लीच्या राजकारणातच आहेत. त्यांना कधीही सत्तापद देण्यात आलेले नाही."

"अजित पवारांना पक्षानं काय कमी दिलं? उपमुख्यमंत्रीपद, मंत्रीपद, विरोधी पक्षनेतेपद अशी विविध पदे दिली. सुप्रिया सुळे या चार वेळा लोकसभेवर निवडून आल्या आहेत. त्यांचे कार्यक्षेत्र लोकसभेपुरतेच सीमित होते. विधिमंडळ पक्षनेते म्हणून अजित पवारांकडे साऱ्या राज्याची सूत्रे होती. एवढे सारे होऊनही पक्षात मला काम करण्यास संधी मिळाली नाही ही अजित पवारांची ओरड निरर्थक आहे," असं शरद पवारांनी म्हटलं.

यावेळी शरद पवारांनी 2004 पासूनच प्रफुल्ल पटेल भाजपबरोबर जाण्यासाठी आग्रही असल्याचं सांगितलं आहे. शरद पवार म्हणाले, "'मी काही राजकीय चुका केल्या,' असं प्रफुल्ल पटेल म्हणतात. मात्र, भाजपनं 2004 च्या निवडणुकीत 'इंडिया शायनिंग'चा प्रचार सुरू केला, तेव्हापासून प्रफुल्ल पटेल हे भाजपबरोबर जाण्यासाठी माझ्याकडे आग्रही होते. तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्याबद्दल आदर असला तरी मते मिळणार नाहीत हे मी त्यांना वारंवार सांगत होतो. पाहिजे तर तुम्ही जा हे मी त्यांना सांगितले तेव्हा पटेल यांच्या डोळ्यात पाणी आले होते."

ajit pawar sharad pawar
Sharad Pawar News : 2004 मध्ये मुख्यमंत्रिपद का नाकारलं? भुजबळांचा उल्लेख करत पवारांनी केला मोठा गौप्यस्फोट

"शेवटी मी सांगत होतो तसाच निकाल लागला. काँग्रेसबरोबर जाण्यास प्रफुल्ल पटेल यांनी विरोध केला, तरीही 'यूपीए' सरकारमध्ये राष्ट्रवादीच्यावतीने मी त्यांच्याकडे नागरी हवाई उड्डाण खाते सोपविले होते," असं शरद पवारांनी सांगितलं.

ajit pawar sharad pawar
Sharad Pawar Vs Ajit Pawar : 'अजित पवारांनी मदतीचा हात मागितला तर देणार का?'; शरद पवारांनी दिले 'हे' उत्तर

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com