Lok Sabha Election News : राज्यातील 450 मतदान केंद्रांचे नियंत्रण करणार तरुणाई

Voting in Maharashtra : महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात पाच मतदारसंघ असून, हे सर्व विदर्भातील आहेत. त्यासाठी शुक्रवारी मतदान होणार आहे.
Election Commission
Election CommissionSarkarnama

Maharashtra Political News : केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election News) अनेक मतदान केंद्रांवर नवनवीन प्रयोग केले जात आहेत. संपूर्ण मतदान केंद्रांचे नियंत्रण महिला, दिव्यांग, युवकांच्या हाती दिले जात आहे. महाराष्ट्रातही राज्य शासनाच्या सेवेत असलेले युवा कर्मचारी 450 केंद्रांचे संपूर्ण नियंत्रण करणार आहेत.

युवा कर्मचारी नियुक्त असलेली मतदान केंद्र संपूर्ण राज्यभरात (Maharashtra) असणार आहेत. या कर्मचाऱ्यांना मतदानाच्या दिवशी मतदान (Voting) केंद्रावरील मतदान प्रक्रिया जबाबदारीचे संपूर्ण प्रशिक्षण देण्यात आले आहे. राज्य शासनाच्या विविध विभागांमधील युवा कर्मचाऱ्यांना निवडणुकीचे काम दिले आहे.

Election Commission
LokSabha Election 2024 : महाराष्ट्रात दीड महिन्यात तब्बल 33 लाख लिटर दारू अन् 11 लाख ग्रॅम ड्रग्ज जप्त

राज्यातील विविध मतदान केंद्रांमध्ये युवा कर्मचाऱ्यांना वेगवेगळ्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. मतदानासाठी युवकांना प्रेरित करण्यासाठी हा उपक्रम राबविला जात आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये युवा कर्मचाऱ्यांकडून नियंत्रित केले जाणारे किमान एक केंद्र देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राज्यात ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक 36 मतदान केंद्रांचे नियंत्रण युवा कर्मचारी करतील. तर रत्नागिरी आणि नाशिकमध्ये प्रत्येकी 30, लातूरमध्ये 29, मुंबई उपनगरमध्ये 26 अशी मतदान केंद्र असतील.

वाशीम, हिंगोली, सातारा आणि गडचिरोली जिल्ह्यांत सर्वात कमी म्हणजे प्रत्येकी 3 मतदान केंद्र देण्यात आली आहेत. राज्यात महिलांच्या खांद्यावरही काही मतदान केंद्रांची जबाबदारी देण्यात आली आहे. अशी मतदान केंद्र राज्यात 440 आहेत, तर दिव्यांग कर्मचाऱ्यांकडून नियंत्रित केल्या जाणाऱ्या मतदान केंद्रांची संख्या 254 आहे.

दरम्यान, उद्या पहिल्या टप्प्यातील मतदान होणार असून, राज्यातील पाच मतदारसंघांचा त्यामध्ये समावेश आहे. देशात एकूण 102 मतदारसंघांमध्ये उद्या मतदान होणार आहे. महाराष्ट्रातील रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर आणि चंद्रपूर या जागांसाठी मतदान होणार आहे. पाचही ठिकाणी एनडीए विरुद्ध इंडिया आघाडी अशी थेट लढत रंगणार आहे.

R

Election Commission
Election Commission: निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर ट्विटरचा राजकीय पक्षांना दणका, पोस्ट हटवल्या

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com