Mumbai News : एकीकडे लोकसभा निवडणुकीची (LokSabha Election 2024) रणधुमाळी सुरू असताना दुसरीकडे निवडणूक आयोगानेही कारवाईचा धडाका सुरू ठेवला आहे. आयोगाच्या निर्देशानुसार महाराष्ट्रात केंद्र व राज्य शासनाच्या विविध विभागांनी 1 मार्च ते 11 एप्रिल दरम्यान तब्बल 421 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये तब्बल 33 लाख लिटरहून अधिक दारू आणि 11 लाख ग्रॅमहून अधिक ड्रग्जचाही समावेश आहे. त्याचप्रमाणे 39 कोटी 10 रुपयांची रोख रक्कमही जप्त करण्यात आली आहे.
देशभरात तब्बल 4 हजार 600 कोटींहून अधिक रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. देशातील लोकसभा निवडणुकीच्या इतिहासात मागील 75 वर्षांतील ही सर्वात मोठी कारवाई ठरली आहे. राज्यातही हा आकडा मोठा आहे. देशात महाराष्ट्रात (Maharashtra) चौथ्या क्रमांकावर आहे. जप्त केलेल्या मुद्देमालामध्ये रोख रक्कम, दारू, ड्रग्ज (Drugs), फ्रिबीज, मौल्यवान धातू आदी बाबींचा समावेश आहे.
मुख्य निवडणूक अधिकारी (Chief Election Officer) तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम यांनी महाराष्ट्रातील कारवाईबाबत माहिती दिली आहे. कारवाईसाठी राज्य व जिल्हा पातळीवर भरारी पथके, स्थिर सर्वेक्षण पथक (एसएसटी), व्हिडिओ सर्वेक्षण पथक (व्हीएसटी), व्हिडिओ पाहणी पथक (व्हीव्हीटी), नेमण्यात आली आहेत. या पथकांद्वारे ही कारवाई केली जात आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
जप्त केलेला मुद्देमाल -
रोख रक्कम – 39.10 कोटी
दारू – 27.18 कोटी रुपये किमतीची 33 लाख 56 हजार 323 लिटर
ड्रग्ज – 212.82 कोटी रुपये किमतीचे 11 लाख 42 हजार 498 ग्रॅम
मौल्यवान धातू – 63.82 कोटी रुपये किमतीचे 2 लाख 90 हजार 613 ग्रॅम
फ्रिबीज - 47 लाख रुपयांचे 51 हजार 272 फ्रिबीज,
इतर बाबी - 78.02 कोटी रुपये किमतीच्या
मुंबई आघाडीवर
राज्यात मुंबई (Mumbai News) उपनगर जिल्ह्यात सर्वाधिक 200 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यानंतर पुणे दुसऱ्या क्रमांकावर असून, जिल्ह्यात 56.85 कोटी त्यापाठोपाठ ठाणे 35.91 कोटी, मुंबई शहर 31.72 कोटी, सांगली 19.77 कोटी, जालना 14.77 कोटी, नागपूर 13 कोटी या जिल्ह्यांचा क्रमांक लागतो. इतर जिल्ह्यांमध्ये कोट्यवधी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.