Lok Sabha Election News : पहिल्या टप्प्यात 16.63 कोटी मतदार बजावणार मतदानाचा हक्क; निवडणूक यंत्रणा सज्ज...

Election Commission : निवडणूक आयोगाकडून पहिल्या टप्प्याची तयारी पूर्ण करणात आली असून, देशभरात तब्बल 18 लाख कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.
Election Commission
Election CommissionSarkarnama

New Delhi News : लोकशाहीच्या सर्वात मोठ्या उत्सवात सहभागी होण्याचे आवाहन केंद्रीय निवडणूक आयोगाने मतदारांना केले आहे. लोकसभा निवडणुकीतील (Lok Sabha Election News) पहिल्या टप्प्याचे मतदान शुक्रवारी होत असून, त्यासाठी संपूर्ण यंत्रणा सज्ज असून तब्बल 16 कोटी 63 लाख मतदार या टप्प्यात मतदानाचा हक्क बजावणार आहेत. लोकसभा निवडणुकीव्यतिरिक्त सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेशमध्ये विधानसभेसाठीही शुक्रवारी मतदान होणार आहे.

लोकसभेच्या पहिल्या टप्प्यात 102 मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. त्यामध्ये 73 मतदारसंघ खुल्या प्रवर्गातील तर 11 अनुसूचित जमाती आणि 18 मतदारसंघ अनुसूचित जाती प्रवर्गातील आहे. अरुणाचल आणि सिक्कीमधील 92 विधानसभा मतदारसंघातही (Assembly Election) मतदान होणार आहे.

Election Commission
Lok Sabha Election News : राज्यातील 450 मतदान केंद्रांचे नियंत्रण करणार तरुणाई

पहिल्या टप्प्यातच सर्वाधिक मतदारसंघांमध्ये मतदान पार पडणार आहे. देशात टप्प्यांत मतदान होणार आहे. निवडणुकीसाठी आयोगाकडून (Election Commission) देशभरात तब्बल 18 लाख कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली असून, 1 लाख 84 हजार मतदान केंद्र आहेत. मतदारांमध्ये 8.4 कोटी पुरुष तर 8.23 कोटी महिला आणि 11 हजार 371 तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

त्याचप्रमाणे पहिल्या टप्प्यात 35 लाख 67 हजार मतदार हे पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावणार आहेत. तर 20 ते 29 वयोगटातील मतदार 3.51 कोटी आहेत. त्यामुळे युवा मतदारांची संख्याही लक्षणीय असल्याचे दिसते. त्यांचा कल कुणाकडे जातो, यावरही उमेदवारांचा विजय अवलंबून असणार आहे.

महिला उमेदवार केवळ 134

पहिल्या टप्प्यातील एकूण 102 मतदारसंघांमध्ये एकूण 1625 उमेदवार असून, त्यामध्ये केवळ 134 महिला आहेत. तर पुरुष उमेदवार 1491 आहेत. प्रमुख लढत इंडिया आघाडी आणि एनडीएच्या उमेदवारांमध्ये होणार असल्याचे चित्र आहे.

मतदान प्रक्रिया व्यवस्थितपणे पार पडावी, यासाठी आयोगाकडून देशात 4 हजार 627 फ्लाइंग स्कॉड तैनात करण्यात आले आहेत. तसेच स्थानिक प्रशासन आणि पोलिस यंत्रणांवरही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. 1374 ठिकाणी आंतरराज्य आणि 162 ठिकाणी आंतरराष्ट्रीय सीमेवर चेक पोस्ट उभारण्यात आल्याची माहिती निवडणूक आयोगाकडून देण्यात आली.

R

Election Commission
Arvind Kejriwal News : जामिनासाठी केजरीवालांची जेलमध्ये ‘शुगर डिप्लोमसी’; ED ने थेट कोर्टात केला मोठा दावा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com