Constable salary fraud : भाजपच्या राज्यात काय चाललंय? कॉन्स्टेबलने घरी बसून 12 वर्षांत घेतला 28 लाख पगार

Constable Earns ₹28 Lakh Without Work in 12 Years : भाजपची सत्ता असलेल्या मध्य प्रदेशात आणि केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचा गृह जिल्हा असलेल्या विदिशा जिह्यामध्ये हा प्रकार घडला आहे.
Police department in Madhya Pradesh under scrutiny after a constable reportedly received ₹28 lakh in salary over 12 years without attending duty.
Police department in Madhya Pradesh under scrutiny after a constable reportedly received ₹28 lakh in salary over 12 years without attending duty. Sarkarnama
Published on
Updated on

Police scam News : प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे अनेक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे कसे फावते, याचे धक्कादायक उदाहरण समोर आले आहे. एका पोलिस कॉन्स्टेबलने तब्बल 12 वर्षे घरी बसून 28 लाख रुपयांचा पगार घेतल्याची माहिती समोर आली आहे. कोणत्याही विभागाच्या लक्षात हा प्रकार आला नाही, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

भाजपची सत्ता असलेल्या मध्य प्रदेशात आणि केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचा गृह जिल्हा असलेल्या विदिशा जिह्यामध्ये हा प्रकार घडला आहे. त्यामुळे प्रशासनात खळबळ उडाली आहे. संबंधित कॉन्स्टेबलची 2011 मध्ये मध्य प्रदेश पोलिस दलात निवड झाली होती. सुरूवातीला त्यांची भोपाळ पोलिस लाईनमध्ये नियुक्ती करण्यात आली होती.

नियुक्तीनंतर काही दिवसांतच प्राथमिक पोलिस प्रशिक्षणासाठी त्यांना सागर पोलिस प्रशिक्षण केंद्रात पाठविण्यात आले. पण प्रशिक्षण केंद्रात जाण्याऐवजी संबंधित कॉन्स्टेबलने थेट विदिशातील घर गाठले, अशी माहिती सहायक पोलिस आयुक्त अंकिता खातेरकर यांनी मीडियाशी बोलताना दिली.

Police department in Madhya Pradesh under scrutiny after a constable reportedly received ₹28 lakh in salary over 12 years without attending duty.
Chandrachud house issue : धनंजय चंद्रचूड यांच्याकडून मोठा खुलासा; सरकारने दिलेल्या दुसऱ्या घराकडे दाखवलं बोट...

संबंधित कॉन्स्टेबलने आपल्या वरिष्ठांना याबाबत माहिती देण्याऐवजी किंवा रजा मिळण्याबाबत काहीच माहिती दिली नव्हती. त्यांनी आपले सेवा पुस्तक स्पीड पोस्टाने थेट भोपाळ पोलिस लाईन्समध्ये पाठवले. तिथे कागदपत्रे मिळाल्यानंतर त्याची कोणतीही खातरजमा करण्यात आली नाही किंवा त्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीबाबतही विचारणा करण्यात आली नाही, असे खातेरकर यांनी सांगितले.

प्रशिक्षण केंद्रातूनही कॉन्स्टेबलच्या अनुपस्थितीबाबत प्रश्न उपस्थित केला नाही. भोपाळ पोलिस लाईन्समधूनही माहिती घेण्यात आली नाही. अनेक महिने, वर्षे लोटली तरी त्या कॉन्स्टेबलने कामावर हजेरी लावली नाही. पण तरीही त्याचे नाव पोलिस दलातील सेवेत कायम राहिले आणि वेतनही बँकेत जमा होत गेले. पोलिस ठाण्यात किंवा प्रशिक्षण केंद्रात पाऊल न ठेवता त्यांना तब्बल 28 लाखांहून अधिक वेतन मिळाले.

Police department in Madhya Pradesh under scrutiny after a constable reportedly received ₹28 lakh in salary over 12 years without attending duty.
विमला गुंज्याल यांनी घडवला इतिहास; पोलिस महानिरीक्षक पदावरून निवृत्त होताच बनल्या सरपंच

सरकारने 2023 मध्ये 2011 च्या भरती झालेल्या तुकडीतील कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीबाबत मुल्यांकन सुरू केल्यानंतर हा प्रकार उजेडात आला. संबंधित कॉन्स्टेबल कुठे नियुक्तीला आहे, याची माहिती अधिकाऱ्यांना मिळाली नाही. कुणालाही संबंधितांचे नाव किंवा चेहराही माहित नसल्याचे समोर आले. विभागीय चौकशीमध्येही कॉन्स्टेबलची कसलीही माहिती मिळाली नाही.

तब्बल 12 वर्षे सेवेत असलेल्या कॉन्स्टेबलला कोणतेही अधिकृत काम किंवा कोणत्याही प्रकारणाच्या तपासासात नियुक्ती न झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. अखेर कॉन्स्टेबलला समन्स पाठविण्यात आल्यानंतर त्याने मानसिक आजारपणाचे कारण दिले. त्यासाठी त्याने कागतपत्रेही सादर केली. पण ती अमान्य करण्यात आले असून विभागाने आता वसुली सुरू केली आहे.

आतापर्यंत त्याने दीड लाख रुपये परत केले असून उर्वरित रक्कम परत करणार असल्याचे सांगितले आहे. तो सध्या भोपाळ पोलिस लाईन्समध्ये नियुक्तीला असून त्याच्या पुढील वेतनातून वसुली केली जाणार आहे. या प्रकाराची चौकशी सुरू असून त्यामध्ये वरिष्ठ अधिकारी दोषी आढळल्यास त्यांच्यावरही कारवाई केली जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com