Chandrachud house issue : धनंजय चंद्रचूड यांच्याकडून मोठा खुलासा; सरकारने दिलेल्या दुसऱ्या घराकडे दाखवलं बोट...

Former CJI Chandrachud Comments on Government-Allotted Housing : धनंजय चंद्रचूड यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना याबाबतची सविस्तर माहिती दिली आहे. त्यांच्या परिस्थितीबाबत माजी सरन्यायाधीश संजीव खन्ना यांना संपूर्ण माहिती देण्यात आली होती.
CJI DY Chandrachud
CJI DY ChandrachudSarkarnama
Published on
Updated on

Former Chief Justice Chandrachud : माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या सरकारी बंगल्याच्या मुद्यावरून वाद निर्माण झाला आहे. सुप्रीम कोर्टाने बंगला ताब्यात घेण्यासाठी केंद्र सरकारला लिहिलेल्या पत्रानंतर आता एक मोठा खुलासा समोर आला आहे. चंद्रचूड यांना सरकारनेच एक तात्पुरते एक भाडेतत्वावर घर दिले आहे. मात्र, या घराच्या दुरूस्तीतच बराच वेळ लागत असल्याचे चंद्रचूड यांनी स्पष्ट केले आहे.

चंद्रचूड यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना याबाबतची सविस्तर माहिती दिली आहे. त्यांच्या परिस्थितीबाबत माजी सरन्यायाधीश संजीव खन्ना यांना संपूर्ण माहिती देण्यात आली होती. त्यांनीच सध्याच्या बंगल्यात राहण्यासाठी मुदत वाढवून दिल्याची माहितीही चंद्रचूड यांनी दिली आहे.

चंद्रचूड यांनी म्हटले आहे की, संजीव गुप्ता हे सरन्यायाधीश असताना त्यांनीच आपल्याला एप्रिलपर्यंत राहण्यासाठी परवानगी दिली होती. त्यानंतर आपल्या विशेष गरजा असलेल्या थोरल्या लेकीसाठी मुदत वाढवून मागितली होती. तिच्यासाठी सध्याच्या घरात आयसीयूप्रमाणे व्यवस्था करण्यात आलेली आहे.

CJI DY Chandrachud
Supreme Court : धनंजय चंद्रचूड यांना बंगल्यातून हटविण्यासाठी सुप्रीम कोर्टाचं धक्कादायक पाऊल; थेट मोदी सरकारकडे धाव

जस्टीस खन्ना यांना एप्रिल महिन्याच्या अखेरीस पत्र लिहून जूनपर्यंत मुदत मागितली होती, असे चंद्रचूड यांनी स्पष्ट केले आहे. आमच्या मुलींच्या विशेष गरजांसाठी आम्ही त्यांच्या सोयीनुसार घर पाहत आहोत. त्यामुळे मी सरकारला तात्पुरते भाडेतत्वार घर देण्याची विनंती केली होती, अशी माहिती चंद्रचूड यांनी दिली आहे.

सरकारने दिलेल्या तात्पुरत्या घराबाबत बोलताना चंद्रचूड यांनी सांगितले की, सरकारने दिलेल्या घरामध्ये दुरूस्तीचे खूप काम होते. ते पूर्ण होण्याची वाट आम्ही पाहत आहोत. ते पूर्ण होताच दुसऱ्या दिवशी आम्ही तिथे जाऊ. आमचे पॅकिंग पूर्ण झाले आहे. घर सज्ज होताच आम्ही तिथे जाणार असल्याचे चंद्रचूड यांनी स्पष्ट केले.

CJI DY Chandrachud
विमला गुंज्याल यांनी घडवला इतिहास; पोलिस महानिरीक्षक पदावरून निवृत्त होताच बनल्या सरपंच

 दरम्यान, सुप्रीम कोर्टाने केंद्रीय गृहनिर्माण व नगर विभागाला पत्र लिहून चंद्रचूड यांच्याकडून सध्या ते राहत असलेला सरकारी बंगला ताब्यात घेण्याची विनंती केली आहे. या पत्रामुळे खळबळ उडाली आहे. माजी सरन्यायाधीशांनी या पत्राबाबत मीडियाशी बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com