Maharashtra IAS Officers Transfer : राज्यातील 11 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, कुणाला कुठे संधी? डॉ. अपूर्वा बसूर सिंधुदुर्ग झेडपीच्या सीईओ

IAS Reshuffle Maharashtra News : राज्यातील 11 वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या गुरुवारी बदल्या करण्यात आल्या आहेत.
IAS Transfer
IAS TransferSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राज्यात गेल्या काही दिवसापासून आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्याचे सत्र सुरु आहे. त्यानंतर गुरुवारी राज्यातील 11 वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये, सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर यांची आयुक्त, पुण्यातील भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेच्या आयुक्त पदावर बदली करण्यात आली आहेत तर जव्हार येथील सहाय्यक जिल्हाधिकारी असलेल्या डॉ. अपूर्वा बसूर यांची सिंधुदुर्ग झेडपीच्या सीईओ पदावर बदली करण्यात आली आहे.

सामान्य प्रशासन विभागाकडून 11 आयएएस अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. त्यामध्ये गजेंद्र बावणे यांची संयुक्त व्यवस्थापकीय संचालक, महावितरण, छत्रपती संभाजीनगर येथे बदली करण्यात आली आहे. तर यापूर्वी डहाणू येथे प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी असलेल्या विशाल खत्री यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, यवतमाळ जिल्हा परिषद येथे बदली करण्यात आली आहे.

2024 बॅचच्या IAS अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या

डोनुरू अनन्या रेड्डी यांची प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प तथा सहाय्यक जिल्हाधिकारी, डहाणू, पी. के. सिद्धार्थ रामकुमार यांची प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प तथा सहाय्यक जिल्हाधिकारी, जव्हार, कुश मोटवानी यांची सहाय्यक जिल्हाधिकारी, वर्धा उपविभाग येथे नियुक्ती करण्यात आली आहे.

IAS Transfer
Maharashtra IAS News: फडणवीस सरकारकडून पुन्हा एकदा प्रशासनात मोठी उलथापालथ; 12 वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

त्यासोबतच आकाश वर्मा यांची सहाय्यक जिल्हाधिकारी, गोंडपिंपरी उपविभाग, चंद्रपूर येथे तर नंदला साईकिरण यांची सहाय्यक जिल्हाधिकारी, भंडारा उपविभाग येथे तर योगेश कुमार मीना यांची सहाय्यक जिल्हाधिकारी, जळगाव उपविभाग येथे तर शिवांश सिंह प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प तथा सहाय्यक जिल्हाधिकारी, अहेरी, गडचिरोली येथे नियुक्ती करण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com