Maharashtra IPS Transfer: CM फडणवीसांचं धक्कातंत्र सुरुच, पुन्हा 8 वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रवींद्र शिसवेंवर मोठी जबाबदारी

IPS Transfer List : राज्य सरकारकडून बदल्यांचा धडाका सुरुच राहिल्यानं प्रशासकीय विभागात खळबळ उडाली आहे. सरकारनं मंगळवारी एकूण आठ वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले आहेत.
ips transfer .jpg
ips transfer .jpgSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकार सत्तेत आल्यापासून सातत्यानं आयपीएस आणि आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका सुरूच राहिला आहे. महायुती सरकारकडून मंगळवारी (ता.13) पुन्हा एकदा वरिष्ठ आयपीएस (IPS Transfer) अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

राज्य सरकारनं मंगळवारी एकूण आठ वरिष्ठ पोलिस (Police) अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले आहेत. त्यामध्ये वरिष्ठ आयपीएस अधिकारी रविंद्र शिसवे, शारदा निकम, आरती सिंह,राजीव जैन यांच्या बदल्यांचा समावेश आहे.

मुंबई लोहमार्ग विभागाचे आयुक्त रवींद्र शिसवे यांची राज्याच्या गुप्त वार्ता विभागात सह आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे. तर अमरावतीचे पोलीस आयुक्त एन डी रेड्डी यांची नागपूर येथे सहपोलीस आयुक्त पदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच राज्य गुप्त वार्ता विभागात सहआयुक्त असलेल्या शारदा निकम यांच्यावर आता अंमली पदार्थविरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

ips transfer .jpg
MLA Kiran Lahamte Car Accident: मोठी बातमी: अजितदादांच्या लाडक्या आमदाराच्या गाडीचा भीषण अपघात; ट्रकची समोरासमोर धडक

केंद्रीय प्रतिनियुक्तीवरुन सुप्रिया पाटील यादव यांची विशेष पोलीस महानिरीक्षक (आस्थापना) या ठिकाणी बदली करण्यात आली आहे. नागपूरचे पोलीस सह आयुक्त निस्सार तांबोळी यांची राज्य राखीव पोलीस बल नागपूर येथे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे. विशेष पोलीस महानिरीक्षक राजीव जैन यांची सागरी विभागाच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

राज्यात देवेंद्र फडणवीसांच्या अधिपत्याखालील महायुती सरकार सत्तेत आल्यापासून प्रशासनात मोठ्या प्रमाणात खांदेपालट करण्यात येत आहे. मुंबईचे उत्तर विभागाचे अपर पोलीस आयुक्त अभिषेक त्रिमुखे यांची विशेष पोलीस महानिरीक्षक (प्रशासन) म्हणून बदली करण्यात आले आहेत.

ips transfer .jpg
Atul Bhosale : पृथ्वीराजबाबांना धूळ चारणाऱ्या अतुल भोसलेंना फडणवीसांकडून ‘टॉनिक’; सातारा लोकसभेतील कामगिरीची बक्षिसी!

राज्य सरकारकडून वरिष्ठ आयपीएस अधिकारी आरती सिंह यांच्या बदलीचे आदेश आदेश काढण्यात आले आहेत. पण त्यांच्या पदस्थापनेचे आदेश स्वतंत्रपणे जारी करण्यात येणार आहेत. राज्य सरकारकडून बदल्यांचा धडाका सुरुच राहिल्यानं प्रशासकीय विभागात खळबळ उडाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com