Teacher recruitment : शिक्षक पदभरतीबाबत महत्वाची बातमी; शिक्षण आयुक्तांच्या ‘त्या’ पत्रानंतर परीक्षा परिषदेवर मोठी जबाबदारी

Teacher vacancy Maharashtra : शिक्षण आयुक्त कार्यालयावर शिक्षक पदभरतीची जबाबदरी असून ती वेळखाऊ प्रक्रिया आहे. कार्यालयाच्या बहुतांश वेळ पदभरतीशी संबंधित कामांसाठीच खर्च होत आहे, असे शिक्षण विभागाने म्हटले आहे.
Teacher recruitment
Teacher recruitmentSarkarnama
Published on
Updated on

MSCE teacher recruitment : शिक्षक पदभरतीबाबत राज्य सरकारने महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आतापर्यंत पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक भरती करण्याची जबाबदारी शिक्षण आयुक्त कार्यालयाकडे होती. मात्र, आयक्तांनी काही दिवसांपूर्वीच राज्य सरकारला पत्र पाठवून ही जबाबदारी अन्य कार्यालयावर सोपविण्याची विनंती केली होती. त्यानुसार सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

शालेय शिक्षण विभागाने याबाबतचा शासन निर्णय आज जारी केला आहे. शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी २०२५ नुसार तसेच यापुढील काळात पवित्र पोर्टलमार्फत राज्य स्तरावरील शिक्षक पदभरतीशी संबंधित सर्व कामकाज महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे सोपविण्यात आले आहे. त्यासाठी एक सुकाणू समितीही स्थापन करण्यात आली असून या समितीच्या मार्गदर्शनाखाली परिषदेकडून काम केले जाईल, असे शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे.

का घेतला हा निर्णय?

शिक्षण आयुक्तांच्या १९ ऑक्टोबरच्या पत्राचा संदर्भ देत शासन निर्णयात म्हटले आहे की, शिक्षण आयुक्त हे शालेय शिक्षण विभागांतर्गत क्षेत्रीय स्तरावरील प्रमुख प्रशासकीय कार्यालय आहे. शालेय शिक्षण विभागाने निश्चित केलेल्या सर्व धोरणांची व घेतलेल्या सर्व निर्णयांची अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना, देखरेख व नियंत्रण ही या कार्यालयाची प्रमुख जबाबदारी आहे.

Teacher recruitment
Mahapalika Election : केशव उपाध्येंनी उमेदवारी मिळालेल्या भाजपच्या तरूण प्रवक्त्यांची नावे शोधली; यादीसह सोशल मीडियात केली ‘खास’ पोस्ट...

शिक्षण आयुक्त कार्यालयावर शिक्षक पदभरतीची जबाबदरी असून ती वेळखाऊ प्रक्रिया आहे. कार्यालयाच्या बहुतांश वेळ पदभरतीशी संबंधित कामांसाठीच खर्च होत आहे. परिणामी इतर महत्वाच्या धोरणांच्या व निर्णयांच्या अंमलबजावणीवर त्याचा काहीसा विपरित परिणाम होत आहे, असे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.

परीक्षा परिषदेकडेच का जबाबदारी?

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद या संस्थेमार्फत शिक्षक पात्रता परीक्षा, शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी यासारख्या परीक्षांचे आयोजन केले जाते. शिवाय भरतीशी संबंधित कामकाज या संस्थेने यापूर्वी हाताळले आहे. पदभरतीशी संबंधित परीक्षेचे आयोजन व निवड प्रक्रिया एकाच संस्थेकडे असणे आवश्यक असून तशी व्यवस्था अंमलात आणण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.

Teacher recruitment
Eknath Shinde news : अखेर भाजपने एकनाथ शिंदेंना ‘आरसा’ दाखविलाच, हा इशारा समजायचा की एक घाव दोन तुकडे..?

सुकाणू समितीत कोण-कोण?

शिक्षण आयुक्त हे सुकाणू समितीचे अध्यक्ष असतील. तर परीक्षा परिषदेचे अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक, प्राथमिक शिक्षण संचालक हे या समितीचे सदस्य असतील. परीक्षा परिषदेच्या आयुक्तांकडे सदस्य-सचिव पदाची जबाबदारी असेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com