Maharashtra Government: महायुतीचं स्वातंत्र्यदिनापूर्वीच सरकारी कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट; पेन्शनधारकांनाही होणार फायदा

Mahayuti government hike Dearness Allowance : केंद्रापाठोपाठ आता महाराष्ट्रातील राज्य सरकारनेही कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. 1 जानेवारी 2025 ते 31 जुलै 2025 दरम्यान वाढ लागू होणार असल्याची माहिती राज्य सरकारकडून देण्यात आली आहे.
Mahayuti Government On Government
Mahayuti Government On Government Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारकडून एकापाठोपाठ एक असे धडाकेबाज निर्णय घेतले जात आहे. आता केंद्रानंतर राज्यातील महायुती सरकारनं सरकारी कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यात 2 टक्क्यांनी वाढ करण्याची मोठी घोषणा केली आहे.

राज्य सरकारने (State Government) कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये 2 टक्क्यांनी वाढ करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे राज्यातील लाखो कुटुंबांना फायदा होणार आहे. राज्य सरकारकडून स्वातंत्र्यदिनाच्या तोंडावर महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय घेण्याची घोषणा करत सरकारी कर्मचाऱ्यांना गुडन्यूज दिली आहे.

केंद्र सरकारनं मार्च महिन्यात केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 2% वाढ केली होती. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये 3 % वाढीनंतर, शेवटच्या अपडेटमध्ये महागाई भत्ता मूळ वेतनाच्या 53 टक्के झाला, त्यानंतर मार्च महिन्यातील वाढीनंतर तो 55 टक्क्यांवर पोहोचला आहे.

केंद्रापाठोपाठ आता महाराष्ट्रातील राज्य सरकारनेही कर्मचाऱ्यांच्या (Government Employees) महागाई भत्त्यामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. 1 जानेवारी 2025 ते 31 जुलै 2025 दरम्यान वाढ लागू होणार असल्याची माहिती राज्य सरकारकडून देण्यात आली आहे. या निर्णयामुळे आता राज्य सरकारचा महागाई भत्ताही 53 टक्क्यावरुन 55 टक्के झाला आहे.

Mahayuti Government On Government
Maratha Reservation: जरांगे फडणवीस सरकारला घाम फोडणार; मराठा आरक्षणासाठी 29 ऑगस्टला मुंबईत आरपारची लढाई; 'या' जिल्ह्यात 10 हजार गाड्यांचं बुकिंग

राज्य सरकारनं कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये 2 टक्क्यांनी वाढ करण्यात निर्णय घेतला आहे.या निर्णयाचा फायदा कर्मचाऱी आणि पेन्शनधारक दोघांना होणार आहे. आता सरकारी कर्मचाऱ्यांना जानेवारी 2025 ते ऑगस्ट 2025 असे एकूण 08 महिन्यांची डी. ए. थकबाकीची रक्कम दिली जाणार आहे.

या सरकारी निर्णयासाठी राज्य सरकारच्या सेवेतील अधिकारी, कर्मचारी तसेच निमसरकारी ( जिल्हा परिषद ) तसेच इतर पात्र असणारे अधिकारी, कर्मचारी व राज्य पेन्शनधारक अधिकारी, कर्मचारी लाभार्थी ठरणार आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांना सरकारकडून महागाई भत्ता दिला जातो तर पेन्शनधारकांना डीआर देण्यात येतो.

Mahayuti Government On Government
Kolhapur Crime: धक्कादायक! 'आमदार राजेश क्षीरसागरांचा मला पाठिंबा, तुला ठार मारीन...'; कॉल रेकॉर्डिंग व्हायरल, कोल्हापुरात खळबळ

तसेच केंद्रातील मोदी सरकार हे केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना दिवाळीदरम्यान, महागाई भत्त्यात (DA) 3 टक्के वाढ होण्याच अंदाज वर्तवला जात आहे. त्यानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आगामी काळात 55 टक्क्यांवरून तब्बल 58 टक्क्यांपर्यंत पोहचू शकतो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com