Job Opportunity : न्यू इंडिया अ‍ॅश्युरन्स कंपनीत मेगा भरती; सहायकपदाच्या 300 जागा भरणार

Assistant post : सहायकपदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना 37000 इतके वेतन दिले जाणार.
 Assistant post
Assistant post Sarkarnama
Published on
Updated on

Job Opportunity : नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी सार्वजनिक क्षेत्रातील नावाजलेल्या विमा कंपनीत नोकरी करण्याची संधी आहे. द न्यू इंडिया अ‍ॅश्युरन्स या कंपनीने सहायकपदाच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. यासाठी उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येणार आहेत. जाणून घ्या विमा कंपनीतील नोकरभरतीबाबतची सविस्तर माहिती.

न्यू इंडिया अ‍ॅश्युरन्स कंपनीच्यामार्फत सहायकपदांच्या तब्बल 300 रिक्त जागांच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून 1 फेब्रुवारी 2024 पासून अर्ज मागविण्यात येत आहे. उमेदवारांना हे अर्ज विमा कंपनीच्या संकेतस्थळावरून ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत. अर्ज करण्याची अंतिम मुदत 15 फेब्रुवारी 2024 आहे.

 Assistant post
Onion Export Ban Effect : कांदा निर्यातबंदीमुळे 50 दिवसांत शेतकऱ्यांचे 1500 कोटींचे नुकसान; ‘भाजपला आम्ही विसरणार नाही’

या भरती अंतर्गत सहायकपदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना 37000 इतके वेतन दिले जाणार आहे. विमा कंपनीच्या सहायकपदाच्या भरतीसाठी देशभरातून अर्ज मागवले जात आहेत. त्यामुळे उमेदवार ज्या राज्यासाठी किंवा केंद्रशासित प्रदेशासाठी अर्ज सादर करणार आहे. त्याला त्या राज्याच्या प्रादेशिक भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

तसेच उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर अथवा समकक्ष असावा. या भरतीसाठी उमेदवाराचे वय हे किमान 21 वर्षे आणि 30 वर्षांपेक्षा जास्त नसावे. सहायकपदासाठी अर्ज सादर करीत असताना पात्र उमेदवाराने आपली शैक्षणिक माहिती सविस्तर भरणे आवश्यक आहे. तसेच उमेदवाराने आपला अर्ज अंतिम मुदतीच्या आधी सबमिट करावा.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवांरांनी पढे दिलेल्या लिंकवर भेट द्यावी. (https://www.newindia.co.in/). तसेच भरतीबाबत अधिकची माहिती पाहण्यासाठी न्यू इंडिया अ‍ॅश्युरन्स विमा कंपनीने दिलेली सविस्तर जाहिरात पाहावी. जाहिरातीची लिंक - https://drive.google.com/file/d/106SBujAl3t1Bnxnfn2ITdP6IEgFiG-B4/view

(Edited by Amol Sutar)

R...

 Assistant post
Nanded Politics News : खासदार चिखलीकर पाच वर्ष संसदेत गप्प का ? अशोक चव्हाणांनी सांगितले 'हे' कारण

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com