Nagpur News : शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नागपूर शहर अध्यक्ष दुनेश्वर पेठे यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. त्यामुळे नागपूरचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
दुनेश्वर पेठे यांच्या पूर्व नागपूरमधील हिवरी नगर येथे एका महिलेचा अपघातात मृत्यू झाला. याची दखल घेऊन दुनेश्वर पेठे यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसचे (Ncp) कार्यकर्ते महिलेच्या घरी गेले. त्यांचा मृतदेह अपघात झालेल्या स्थळावर ठेवून आंदोलन केले. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. (Nagpur Ncp News)
वाहतुकीची कोंडी आणि रस्ता रोको आंदोलनाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आंदोलकांना ताब्यात घेतले. दुनेश्वर पेठे यांच्यासह 12 जणांवर मृतदेहाची विटंबना आणि शासकीय कमात अडथळा असे दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पेठे यांच्यासह सर्व आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून नंदनवन पोलिस (Police) ठाण्यात रात्री उशिरापर्यंत बसवून ठेवले आहे.
पेठे यांच्या घरासमोर उड्डाण पुलाचे काम सुरू आहे. या पुलाला पेठे यांनी विरोध दर्शवला होता. फारशी वाहतूक नसताना उड्डाणपुलाची गरज नाही, असेही त्यांनी यापूर्वी निवेदनाद्वारे आपला विरोध दर्शवला आहे. पुलाचे काम सुरू असल्याने जागोजागी खोदकाम सुरू आहे. कंत्राटादरांनी बॅरिकेट्स लावले आहेत. त्यामुळे मोठी गैरसोय या मार्गाने प्रवास करताना नागरिकांची होत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर अध्यक्षांना अटक करण्यात आल्याने कार्यकर्ते संतापले आहेत. यावरून पूर्व नागपूरमध्ये राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे दुनेश्वर पेठे हे विधानसभेचे पूर्व नागपूर विधानसभेचे दावेदार आहेत. नागपूर महापालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीतर्फे निवडून आलेले एकमेव नगरसेवक आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.