Bjp News : लोकसभा निवडणुकीत महायुतीला मोठा पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे भाजपकडून या पराभवाची कारणे शोधून आत्मचिंतन केले जात आहे. विशेषतः भाजपने मुंबईतील 36 विधानसभा मतदारसंघांवर सर्वाधिक लक्ष केंद्रित केले आहे. या ठिकाणी आढावा बैठका घेऊन रणनीती ठरवण्यात येत आहे.
मुंबईतल्या काही मतदार संघात लोकसभा निवडणुकीत मुस्लिम मतांचा सर्वाधिक फटका बसला. यामुळे येत्या काळात हिंदू मतदारापर्यंत पोहोचून जनजागृती करण्यावर भर देण्यात येणार आहे. त्यासोबतच उत्तर भारतीय मतदार भाजपपासून (Bjp) दुरावले असून त्यांना पुन्हा भाजपकडे वळवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. (Bjp News)
आगामी काळात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीवर भाजपने लक्ष केंद्रित केले आहे. राज्यात सत्ता मिळवायची असेल तर या निवडणुकीवर सर्व फोकस भाजपने केला आहे. त्यासाठी महायुतीला सत्तेपर्यंत पोचण्याचा मार्ग म्हणून भाजपने मुंबईवर विशेष लक्ष दिले आहे. येत्या काळात भाजपचे सहप्रभारी अश्विनी वैष्णव यांनी त्यासाठीचा प्लॅन तयार ठेवला आहे.
मुंबईतील 36 विधानसभा मतदारसंघांची संपूर्ण माहिती संघ आणि भाजपचे पदाधिकारी मिळून येत्या काळात घेणार आहेत. त्यानुसार प्रत्येक विधानसभा मतदार संघाचा एक रिपोर्ट तयार करण्यात येणार आहे. त्यामध्ये नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक मताधिक्य मिळालेले मतदार संघ आणि मताधिक्य न मिळालेले मतदारसंघ अशी वर्गवारी करण्यात येणार आहे. त्यानंतर मुंबईत कुणाला परत संधी द्यायची, कुणाच्या जागी नवा चेहरा द्यायचे हे ठरवले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने मुंबईत बाजी मारली. चार जागा लढताना तीन जागी विजय मिळवला. एक जागा काँग्रेस, एक जागा भाजप तर एक शिंदे सेनेला काठावर जागा मिळाली. त्यातच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला (Shivsena ) मुस्लीम समाजाच्या रूपाने नवे मतदार मिळाले आहेत. त्यामुळे ठाकरेंसाठी ही निवडणूक सोपी झाली होती.
उत्तर भारतीय भाजपपासून दुरावले
उत्तर भारतीय भाजपपासून दुरावले आहेत. शिवसेना हा एकेकाळी कट्टर हिंदुत्ववादी पक्ष म्हणून ओळखला जायचा आणि त्यामुळे मुस्लिम समाज शिवसेनेपासून दोन हात लांबच पाहायला मिळत होते, आता हे चित्र बदलले आहे. त्यामुळे येत्या काळात दुरावलेले उत्तर भारतीय मतदार पुन्हा भाजपसोबत जोडण्यासाठी कसरत करावी लागणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.