Bank Strike Big Update : मोठी बातमी: देशभरातील 9 बँका 'या' तारखेला संपावर जाणार

Bank Strike News : युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सकडून आयबीएसोबतच्या बैठकीत सर्व कॅडरमध्ये भरती आणि पाच दिवसांच्या कामाच्या आठवड्यासह विविध मुद्दे उचलून धरण्यात आले होते.
Bank  Strike .jpg
Bank Strike .jpgSarkarnama
Published on
Updated on

New Delhi News : देशभरातील एकूण 9 बँका संपावर जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. हा संप (Strike) येत्या 24 आणि 25 मार्च रोजी पुकारण्यात आला आहे. यातच 22 तारखेला चौथा शनिवार व 23 ला रविवार आला आहे. यामुळे एक दोन नव्हे तर सलग 4 दिवस बँका बंद राहण्याची शक्यता आहे.

बँकांशी संबंधित युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स (UFBU) ने याबाबतची माहिती दिली आहे. विविध मागण्यांसाठी कर्मचारी संघटनांनी 24 आणि 25 मार्च रोजी दोन दिवसांचा देशव्यापी संप पुकारला आहे,यावेळी संघटनेनं म्हटलं आहे.हा संप विविध मागण्यांसाठी करण्यात आला आहे.

'यूएफबीयू'ने कर्मचारी संघटनेच्या प्रमुख मागण्यांबाबत इंडियन बँक्स असोसिएशन सोबत झालेल्या चर्चेचा मागण्यांबाबत कोणताही तोडगा निघालेला नाही. बैठकीत आमच्या प्रमुख समस्याच मार्गी लागलेल्या नाहीत, असा दावा करत युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने अखेर संप पुकारला आहे.

Bank  Strike .jpg
Vote jihad Politics: आसिफ शेख यांचा धक्कादायक दावा, ‘होय, निवडणुकीसाठी मालेगावात बाहेरून पैसे आले’

युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सकडून आयबीएसोबतच्या बैठकीत सर्व कॅडरमध्ये भरती आणि पाच दिवसांच्या कामाच्या आठवड्यासह विविध मुद्दे उचलून धरण्यात आले होते. पण मागण्यांबाबत कोणताही निर्णय झाला नसल्यानं अखेर 9 बँक कर्मचारी संघटनांकडून संपाची घोषणा केली होती.

बँक (Bank) कर्मचारी संघटनांकडून सरकारी बँकांमधील रिक्त पदांवर नियुक्ती,कार्यप्रदर्शन पुनरावलोकन आणि प्रोत्साहन योजना रद्द करण्यात यावी यांसारख्या मागण्या करण्यात आल्या आहेत. 'डीएफएस' (डिपार्टमेंट ऑफ फायनान्शियल सर्व्हिसेस)कडून जारी करण्यात आलेल्या नव्या धोरणांमुळे नोकरीबाबत असुरक्षिततेची भावना कर्मचार्‍यांमध्ये निर्माण झाल्याचंही युनियन्सकडून सांगण्यात आलं आहे.

Bank  Strike .jpg
Massajog Villagers Decision : मस्साजोग ग्रामस्थांचा मोठा निर्णय; ‘आरोपींना जोपर्यंत फाशी होत नाही, तोपर्यंत गावात एकही सण साजरा करणार नाही’

ग्रॅच्युएटी कायद्यात सुधारणा करुन त्याची मर्यादा इतर सरकारी कर्मचाऱ्यांच्या योजनेच्या तुलनेत बरोबरीचे असेल. त्याचमुळे ही मर्यादा 25 लाखांपर्यंत वाढवण्यात आली तर आयकरातून सूट मिळणार असल्याचं यावेळी कर्मचार्‍यांच्या संघटनेनं भूमिका मांडली आहे. तसेच बँक कर्मचार्‍यांच्या कार्यालयीन वेळेतील कामकाजामधील सूक्ष्म व्यवस्थापनवर

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com