Non Teaching Staff Recruitment : संचमान्यतेच्या निकषांचा मोठा फटका! शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची 25 टक्केच पदभरती होणार?

Maharashtra non teaching staff recruitment news : माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाच्या शिक्षण संचालकांच्या पत्रानुसार शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीला ११ ऑगस्ट रोजी मान्यता दिली.
Maharashtra Non Teaching Staff Recruitment News
Teaching Non Teaching Staff News:AI
Published on
Updated on

Kolhapur News : राज्य सरकारने नुकताच शिक्षकेतर कर्मचारी भरतीला मंजुरी दिली आहे. त्यामुळे भरती प्रक्रियेचा आकृतीबंध तयार झाला असताना संच मान्यतेतील निकषांमुळे या भरती प्रक्रियेला पुन्हा अडचणीचा डोंगर पोखरावा लागणार आहे. त्यामुळे मंजूर पदांपैकी केवळ 25 टक्के पदे भरली जाण्याची शक्यता आहे. राज्यात केवळ 9000 पदेच भरली जाण्याची शक्यता आहे.

माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाच्या शिक्षण संचालकांच्या पत्रानुसार शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीला ११ ऑगस्ट रोजी मान्यता दिली. त्यावेळी राज्यातील रिक्त पदांची आकडेवारी व सुधारित परिस्थितीची माहिती घेऊन आकृतीबंध तयार करण्याच्या सूचना दिल्या होत्या. यानुसार वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, पूर्ण व अर्धवेळ ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहायक या पदाचा समावेश आहे.

यामध्ये कनिष्ठ लिपिक १६ हजार २९८, वरिष्ठ लिपिक ४ हजार २०५, प्रयोगशाळा सहायक ५ हजार ८९३, ग्रंथपाल प्रवर्गात अर्धवेळ ग्रंथपाल २ हजार ८७४ आणि पूर्णवेळ ग्रंथपाल २ हजार ३१ अशी ४ हजार ९०५ पदे मंजूर आहेत. मुख्य लिपिक ९८८ अशी २२ हजार १९१ प्रयोगशाळा सहायक विज्ञान शाखेसह उच्च माध्यमिक विद्यालयासाठी २ हजार ४० पदे अशी एकूण ३५ हजार २९ पदे मंजूर आहेत.

Maharashtra Non Teaching Staff Recruitment News
Teacher Recruitment : ​शिक्षक भरतीत महिलांना मोठी संधी; तब्बल 13 हजार पदांची शिफारस यादी जाहीर!

दरम्यान, संस्थांना अद्यावत आकृतीबंधनुसार रिक्त पदांची संख्या निश्चित करून बिंदुनामावली तपासावी लागणार आहेत. शिवाय त्यासाठी प्रथम पदोन्नतीचा मार्ग अवलंबावा लागेल. जर त्या संदर्भातील जागा रिक्त नसेल तर भरतीचा मार्ग निवडावा लागेल. शिवाय अनुकंपावरील उमेदवार नसेल संस्थांना भरती करता येणार आहे.

Maharashtra Non Teaching Staff Recruitment News
Maharashtra Kotwal Recruitment: महसूल विभागात मोठी भरती! 2 हजार 122 कोतवाल पदे भरणार; पुण्यात 149 जागा

राज्य सरकारकडून 80 टक्के ही पदे भरली जाणार असल्याचे सांगितले जात असले तरी यामधील 50 टक्के कर्मचारी हे कार्यरत आहेत. तर संचमान्यतेच्या निकषामुळे 25 टक्के पदे अतिरिक्त आहेत. त्यामुळे ही भरती प्रक्रिया झाली तर केवळ पंचवीस टक्के पदे भरली जाण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com