National Thermal Power Corporation
National Thermal Power CorporationSarkarnama

Job Opportunity in NTPC : इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी 'गुड न्यूज'; नोकरीची मोठी संधी !

Job Opportunity National Thermal Power Corporation: नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशनमध्ये 233 जागांसाठी भरती
Published on

NTPC Recruitment : केंद्र सरकारच्या अखत्यारीतील नॅशनल थर्मल पॉवर या कंपनीमध्ये नोकर भरती करण्यासंदर्भात जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी या कंपनीमध्ये नोकरी करण्याची सुवर्ण संधी आहे. 'एनटीपीसी'ने(NTPC) प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार एकूण 223 रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे. या भरती संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात.. (Job Opportunity in NTPC)

नॅशनल थर्मल पॉवर ही उर्जा निर्मिती विभागातील कंपनी आहे. सार्वजनिक क्षेत्रातील या कंपनीने असिस्टंट एक्झिक्युटिव (ऑपरेशन्स) या पदासाठी भरती जाहीर केली आहे. कंपनीकडून या पदाच्या एकूण 223 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी कंपनीने पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवले आहेत. त्यासाठी उमेदवाराने 'एनटीपीसी'च्या अधिकृत संकेतस्थळावर careers.ntpc.co.in लॉगिन करून आपला अर्ज सादर करायचा आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

National Thermal Power Corporation
Job Opportunity in NDA : पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये नोकरीची संधी; 198 जागा भरणार

'एनटीपीसी'च्या असिस्टंट एक्झिक्युटिव या पदासाठी उमदेवाराने इलेक्ट्रिकल/ मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवी प्राप्त केलेली असावी. तसेच उमेदवाराकडे पदवी पूर्ण झाल्यानंतर या क्षेत्रातील किमान एक वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे. ही पात्रता पूर्ण असलेलेचे उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात. या पदासाठी पात्र उमेदवाराचे वय हे दि. 08 फेब्रुवारी 2024 रोजी 35 वर्षांच्या आत असावे. तसेच या भरतीसाठी सरकारी नियमानुसार मागासवर्गीय उमेदवारांना या जास्तीत जास्त 05 वर्षे सूट, आणि OBC प्रवर्गातील उमेदवारांना 03 वर्षे वयाची सूट देण्यात आली आहे.

या भरतीसाठी पात्र उमेदवाने आपला अर्ज 'एनटीपीसी'च्या careers.ntpc.co.in या संकेतस्थळावर ऑनलाईन सादर करायचा आहे. तसेच अर्ज भरताना उमेदवाराने आपली शैक्षणिक पात्रता, अनुभव या संबंधीची अचूक आणि पूर्ण माहिती भरावी. अपू्र्ण माहितीचा अर्ज बाद ठरवण्यात येईल. या भरतीसाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकडून 300 रुपये फी आकारली जाणार आहे.

हे शुल्क उमेदवाराने ऑनलाईन भरणा करायचे आहे. मागासवर्गीय प्रवर्गाती उमेदवारांकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही. अर्ज करण्याची अंतिम मूदत ही 8 फेब्रुवारी 2024 आहे. या भरतीसंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पुढील लिंकवर भेट द्या..https://drive.google.com/file/d/1AgspN5HTN41dklGk2J64X6pCTA65tT6g/view

(Edited By-Ganesh Thombare)

National Thermal Power Corporation
Job Opportunity in BDL : नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी खुशखबर; फक्त मुलाखतीद्वारे होणार निवड

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com