Pimpri Chinchwad : वर्ष संपत आले असताना पुणे एसीबी काहीसे अॅक्टीव मोडवर आले आहे. दोन दिवसांपूर्वीच (ता.१८) त्यांनी रेशनकार्ड काढून देण्यासाठी एका ६८ वर्षीय ज्येष्ठाकडून लाच घेणारा जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयातील दलाल शंकर शिवाजी क्षीरसागर (वय 32) याला पकडले होते. त्यानंतर 48 तासात त्यांनी जमादार (सहाय्यक पोलिस फौजदार) याला रंगेहात पकडला. पुणे ग्रामीणच्या शिरुर पोलिस ठाण्यातील राजेंद्र दगडू गवारे (वय 53) याला एका ज्येष्ठ नागरिकाकडून दहा हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक केली.
पिंपरी-चिंचवडमधील चिखली पोलिस ठाण्यातील जमादार नरेंद्र लक्ष्मण राजे (वय 54) याला पोलिस ठाण्यातच वीस हजारांची लाच घेताना नुकतेच (ता.१७) पकडण्यात आले होते. त्यानंतर पुणे रेंजच्या एसीबी युनीटने बुधवारी (ता.२०) राजेंद्र दगडू गवारे याला लाच घेताना अटक केली.
६५ वर्षीय ज्येष्ठ तक्रारदाराकडे गवारे याने प्रथम पन्नास हजार रुपयांची लाच मागितली. नंतर दहा हजारावर तडजोड केली.ती शिरुर तहसीलदार कचेरीसमोरील मित्रधन हॉटेलमध्ये घेताना त्याला पकडण्यात आले.हा ज्येष्ठ व त्याच्या मुलाविरुद्ध शिरुर पोलिस ठाण्यात एक गुन्हा दोन वर्षापूर्वी नोंदला गेला होता.त्यात अटक न करता मदत करण्यासाठी गवारेने लाच मागितली होती.ती घेताना पीआय प्रणेता सांगोलकर तसेच काकडे, आशिष डावकर,प्रवीण तावरे या पथकाने त्याला पकडले.
त्यानंतर तो काम करीत असलेल्या शिरुर पोलिस ठाण्यातच त्याच्याविरुद्ध लाचखोरीचा गुन्हा आज दाखल करण्यात आला. कोणी शासकीय अधिकारी , कर्मचारी कोणतेही शासकीय काम करण्यास फी व्यतिरिक्त लाच मागत असेल,तर संपर्क करण्याचे आवाहन एसीबीने केले आहे.
(Edited By Roshan More)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.