Pune ACB News: एसीबीचा दणका ! 20 हजारांची लाच घेताना पोलिसाला रंगेहाथ पकडलं

Chikhali Police : लाचखोरांचं धाडस वाढलं? अपघातग्रस्त गाडी परत देण्यासाठी मागितली एक लाखांची लाच; पोलिस अधिकाऱ्याला एसीबीने रंगेहाथ पकडलं
Chikhali Police News
Chikhali Police NewsSarkarnama
Published on
Updated on

Pimpri News: ट्रॅपच्या कारवाईचा पुणे रेंज एसीबीचा काहीसा मंदावलेला वेग कायम आहे. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या पश्चिम महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या या युनिटची पुणे जिल्ह्यातील शेवटची ट्रॅपची कारवाई गेल्या महिन्यात 21 तारखेला ती ही अगोदरचा ट्रॅप केल्यानंतर 15 दिवसांनी क्लास थ्री कर्मचाऱ्याविरुद्ध झाली होती. त्यानंतर महिन्य़ाने रविवारी (ता.17) ट्रॅपची कारवाई करण्यात आली.

चिखली पोलिस ठाण्यातील सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक (जमादार) नरेंद्र लक्ष्मण राजे (वय -54) याला पोलिस ठाण्यातच वीस हजारांची लाच घेताना पकडण्यात आले. अपघात झाल्याने जप्त केलेली मोटार त्याच्या मालकाला परत देण्यासाठी त्याने दीड लाख रुपये मागितले.

नंतर एक लाखावर तडजोड केली. त्यातील सत्तर हजार रुपये दोन हफ्त्यात त्याने घेतले होते. तिसरा वीस हजाराचा लाचेचा हफ्ता घेताना तो पकडला गेला. एसपी अमोल तांबे आणि अॅडिशनल एसपी डॉ.शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली पीआय प्रसाद लोणारे तसेच भूषण ठाकूर, सुराडकर, चव्हाण या पथकाने ही सापळा कारवाई केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

21 नोव्हेंबरला `महावितरण`च्या हडपसर उपविभागाचा कनिष्ठ कार्यालयीन सहाय्यक सोहेल सुलेमान शेख (वय 42) याला साडेचार हजार रुपयांची लाच घेताना पकडण्यात आले. त्यात दीड हजाराच्या नोटा या खेळण्यातील म्हणजे खोट्याच होत्या.

त्यानंतर 15 दिवसांनी 6 डिसेंबरला पुणे एसीबीने साडेनऊ कोटी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता जमा केल्याबद्दल सोलापूर, सांगली आणि पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्यांविरुद्ध अपसंपदेचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर त्यांनी चिखलीत आज ही ट्रॅपची कारवाई केली.

दुसरीकडे लाचखोर पकडण्याचा त्यांचा अव्वल नंबर यावर्षी हिसकावून घेतलेल्या नाशिक रेंज एसीबीचा कारवाईचा धडाका सुरुच आहे. मोठे मासे ते गळाला लावत आहेत, हे विशेष.

(Edited by- Ganesh Thombare)

Chikhali Police News
Sharad Pawar: मी अजूनही तरुणच...लवकरच नवा इतिहास घडविणार! पवारांचा निर्धार...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com