पोलिस घरात पोचताच नवनीत राणांची फडणवीस, राणेंना मदतीसाठी विनंती

तुमच्या मदतीची आज आम्हाला गरज आहे. आमच्यासारख्या लोकांना महाराष्ट्रात न्याय भेट नसेल, तर भविष्यात कोणीही न्यायायासाठी लढणारा राहणार नाही.
Devendra Fadnavis-Navneet Rana-Narayan Rane
Devendra Fadnavis-Navneet Rana-Narayan RaneSarkarnama
Published on
Updated on

मुंबई :विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांना मी विनंती करते की, आज तुमच्यासारखे लोक नेते असतानासुद्धा या महाराष्ट्रात लोकप्रतिनिधींसोबत अशा प्रकारचा व्यवहार होतो आहे. तुमच्या मदतीची आज आम्हाला गरज आहे. आमच्यासारख्या लोकांना महाराष्ट्रात न्याय भेट नसेल, तर भविष्यात कोणीही न्यायायासाठी लढणारा राहणार नाही, असा इशारा खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी व्हिडिओ करून दिला आहे. (Navneet Rana's request for help Devendra Fadnavis, Narayan Rane)

खार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर आमदार रवि राणा आणि खासदार नवनीत राणा यांना ताब्यात घेण्यासाठी पोलिस त्यांच्या घरी पोचले होते. त्यावेळी त्यांची पोलिसांबरोबर शाब्दीक बाचाबाची झाली. पोलिसांकडे राणा दांपत्याने अटक वॉरंटची मागणी केली. त्याचवेळी खासदार राणा यांनी एक व्हिडिओ करत फडणवीस आणि राणे यांच्याकडे मदतीची मागणी केली.

Devendra Fadnavis-Navneet Rana-Narayan Rane
मोठी बातमी : राणा दांपत्याला खार पोलिसांकडून अटक; हे कलम लावले

त्या म्हणाल्या की, आज आमच्या घरात मुंबई पाेलिस जबरदस्तीने घुसले आहे. मातोश्रीसमोर आज आम्ही आंदोलन करणार असल्याचे सांगितले होते. त्यामुळे पोलिसांनी आम्हाला नोटीस दिली होती. त्यानुसार आणि लोकप्रतिनिधीचे एक कर्तव्य म्हणून आम्ही आज दिवसभर घराच्या बाहेर पाऊलही ठेवले नाही. मात्र, पोलिस आमच्या घरात जबरदस्तीने घुसले आहेत आणि ते आम्हाला जबरदस्तीने पोलिस ठाण्यापर्यंत नेत आहेत.

Devendra Fadnavis-Navneet Rana-Narayan Rane
महाराष्ट्र दिल्लीत कोणालाही टक्कर देईल : अजित पवारांचे सूचक वक्तव्य

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मला एक प्रश्न विचारायचा आहे. ज्या पद्धतीने आम्ही संविधान आणि नियमांचे पालन केले आहे. पोलिसांच्या नाेटिशीनंतर आम्ही घराच्या बाहेर पाऊलसुद्धा ठेवलेले नाही. तरीसुद्धा आमच्यावर गुन्हा दाखल होत आहे. जबरदस्तीने आम्हाला पोलिस ठाण्यात नेले जात आहे. हे कोणते नियम, पद्धती आणि संविधान महाराष्ट्रात पाळले जात आहे. आम्हीही २५ लाख लोकांचे नेतृत्व करीत आहोत. अशा पद्धतीची गुंडशाही आजपर्यंत आम्ही महाराष्ट्रात कधीही पाहिलेली नाही. आमदार आणि खासदारांना जबरदस्तीने गाडीत बसवून नेत आहेत, असे सवाल नवनीत राणा यांनी उपस्थित केले आहेत.

Devendra Fadnavis-Navneet Rana-Narayan Rane
उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या ताफ्यात नवदांपत्याची अचानक एन्ट्री

दरम्यान, शिवसेनेच्या तक्रारीनंतर खार पोलिसांनी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवि राणा यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर १५३ अ हे कलम लावण्यात आले आहे. तत्पूर्वी राणा दांपत्यास घराबाहेर काढताना पोलिसांची कसोटी लागली होती. पोलिस राणा दांपत्यास वारंवार विनंती करत होते. त्यावेळी राणा हे पोलिसांना आमचे अटक वॉरंट दाखवा, असे विचारत होते. त्यामुळे ते पोलिसांसोबत येण्यास तयार नव्हते. पण पोलिसांच्या शिष्टाईला यश आले आणि त्यांना कडेकोट पोलिस बंदोबस्तात राणा यांना त्यांच्या खार येथील घरातून सुरक्षितपणे बाहेर काढले.

नारायण राणेंचे शिवसैनिकांना आव्हान

राणा कुटुंबीय घराबाहेर पडणार असतील तर पोलिसांनी हस्तक्षेप करून त्यांना जाऊ द्यावे. त्यांना कोणी अडवलं, जाऊ दिलं नाही तर मी स्वतः काही वेळाने खारमध्ये राणा यांच्या घरी जाणार आहे. राणा कुटुंबीयांना घराच्या बाहेर काढणार. बघूया कोण येतंय तिकडे. कोण अडवतंय. मर्द आहात ना? मग या तिकडे. नाही तर त्या अगोदर पोलिसांनी त्यांना घराबाहेर काढावे, असे आव्हान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसैनिकांना दिले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com