Maharashtra Assembly Winter Session 2023 : विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी राज्य सरकारच्या कारभारावर घणाघाती टीका केली. आमदार तनपुरे यांच्या रडावर महसूल विभाग होता.
आमदार तनपुरे म्हणाले, "तीन वर्षे चांगला पाऊस झाला. यावर्षी जिल्ह्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली. सरकारने 40 हून अधिक तालुक्यांचा दुष्काळसदृश्य यादीत केला. पण नगर जिल्ह्यातील गावांचा सुरुवातीला यामध्ये समावेश नव्हता. दुष्काळाची परिस्थिती असताना नगरचे पाणी मराठवाड्यासाठी सोडण्यात आले. दुष्काळसदृश्य परिस्थिती निकष पहिले तर कोणताही फायदा महसूली मंडळांना होणार नाही". शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचे दिसून येत आहे. 'एनडीआरएफ'च्या निकषांप्रमाणे पहिले तर शेतकऱ्यांना कोणतीही मदत मिळणार नाही. हा फक्त शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार आहे, अशा शब्दांत आमदार तनपुरे यांनी सरकारवर निशाणा साधला.
कृषिपंपांना वीज बिलात सूट दिली. मात्र खरी गरज पाणीपुरवठ्याचा प्रश्न हा या दुष्काळजन्य परिस्थितीमध्ये महत्त्वाचा आहे. पाणीपुरवठा करणाऱ्या योजनांच्या वीजबिलात सूट देणे गरजेचे आहे. वीज कनेक्शन बंद केले जाऊ नये. मात्र महावितरणकडून वीजपुरवठा खंडित केला जातो आहे. यामुळे दुष्काळजन्य परिस्थिती पाहता, यावर काहीतरी ठोस निर्णय घेण्यात यावा, असे ते म्हणाले. ( Assembly Winter Session 2023 )
पीकविम्याबाबत अनेक मोठ्या घोषणा सरकारकडून करण्यात आल्या. पण खूप कमी लोकांना याचा फायदा मिळाला आहे. अनेक शेतकरी या योजनेपासून वंचित आहेत. केवळ सरकारकडून घोषणा केल्या जात असून वास्तविक पाहता शेतकऱ्यांना कोणतीही मदत मिळत नाही, असे विदारक चित्र आमदार प्राजक्त तनपुरे सांगितले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
दूध उत्पादक वर्ग मोठ्या प्रमाणावर आहे. पण दुधाचे दर काही दिवसांपूर्वी 35 ते 40 रुपयांवर गेलेले दुधाचे दर आता 20 ते 25 रुपयांवर आले आहेत. महाविकास आघाडीने दूध खरेदी करून दुधाच्या दरावर नियंत्रण ठेवले होते. या सरकारच्या काळात दुधाचे दर पडले आहेत. ग्राहक खरेदी करत असलेल्या दुधाचे दर काही कमी नाही. यामुळे सरकारने दुधाच्या दराबाबत निर्णय घेणे गरजेचे आहे, असेही आमदार प्राजक्त तनपुरे म्हणाले.
Edited by sachin fulpagare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.