Pune News : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा अॅड. प्रकाश आंबेडकर यांची काल पुण्यात भेट झाल्याची चर्चा आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर 'वंचित'चा इंडिया आघाडीतल्या समावेशाबाबत शिवसेना ठाकरे गट आग्रही आहे. याच अनुषंगाने आंबेडकर-पवार भेट झाल्याची चर्चा आहे. पुण्यातील मोदीबाग या पवारांच्या निवासस्थानी ही भेट झाल्यीची सूत्रांची माहिती आहे. पण, आंबेडकरांनी अशी भेट झाली नसल्याचे सांगत, भेटीचे वृत्त फेटाळले. (Latest Marathi News)
पुण्यातील शरद पवार यांचे मोदीबाग या निवासस्थानी आंबेडकर गेले असल्याची चर्चा होती. या कथित भेटीवर आता राजकीय वर्तुळात वेगवेगळे तर्क-वितर्क लढवले जात आहेत. मात्र याबाबत आंबेडकरांकडून ही भेट झाली नसल्याचे सांगण्यात आले आहे. शरद पवार ज्या मोदीबागेत राहतात, त्याच ठिकाणी माझे नातेवाईकही राहतात. माझ्या दोन बहिणींचे तिथे निवासस्थान आहे. त्यांना भेटण्यासाठी मी त्या ठिकाणी गेलो होतो, असं आंबेडकर यांनी स्पष्टीकरण दिले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
"शरद पवार ज्या मोदी भागात राहतात, तिथेच बाजूच्या परिसरात माझे नातेवाईक राहतात. माझ्या दोन बहिणींचे इथे निवास्थान आहे. त्यांना भेटण्यासाठी मी मोदीबाग परिसरात आलो होतो. यामुळे माध्यमांचा चुकीचा समज झाला की, मी पवारांची भेट घ्यायला आलो आहे. पवारांची माझी भेट झालेली नाही. किंवा मी त्यांना भेटायला आलो नव्हतो," असे ते म्हणाले.
(Edited By - Chetan Zadpe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.