Pune RTO : दिवाळीत नवी गाडी घेताय..., आवडीचा नंबर पाहिजे? 'पुणे आरटीओ'कडून मोठी अपडेट समोर

Pune RTO Diwali 2025 : दिवाळीच्या आणि लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावरती अनेकजण गाडी खरेदीचा बेत आखताना पाहायला मिळतात. स्वप्नातील गाडी घेताना त्या गाडीचा क्रमांकही आपल्या आवडीप्रमाणे असावा, असा अट्टाहास काहीजणांचा असतो.
rto
rto sarkarnama
Published on
Updated on

Pune News : दिवाळीच्या आणि लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावरती अनेकजण गाडी खरेदीचा बेत आखताना पाहायला मिळतात. स्वप्नातील गाडी घेताना त्या गाडीचा क्रमांकही आपल्या आवडीप्रमाणे असावा, असा अट्टाहास काहीजणांचा असतो. आणि अशाच आवडीचा नंबर हवा असलेल्या लोकांसाठी पुणे परिवहन कार्यालयाने लिलाव प्रक्रिया जाहीर केली आहे.

दिवाळी सणानिमित्त वाहनखरेदीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने नागरिकांना त्यांच्या वाहनांची नोंदणी वेळेत होऊन, सणासुदीच्या सुट्यांमध्येही क्रमांक मिळावा याकरिता पुणे आरटीओने (RTO) वाहनांसाठी नवीन मालिका सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

आवडत्या नंबरसाठी अर्ज करावा लागणार

खाजगी चारचाकी वाहनांसाठी पसंतीचे क्रमांक हवा असल्यास त्यासाठी शुल्क भरावे लागणार आहे. त्यांना आवडता नंबर हवा आहे, अशांना या नंबरसाठी तिप्पट शुल्क भरावे लागणार आहे. ज्यांना हा नंबर हवा आहे त्या इच्छुकांनी दिनांक 15 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 10.30 ते दुपारी 2.30 या वेळेत अर्ज सादर करावेत असे आव्हान आरटीओकडून करण्यात आले आहे.

अर्ज करताना त्यासोबत डीडी, पत्त्याचा पुरावा, ओळखपत्र व पॅनकार्डच्या साक्षांकित प्रती जोडावे लागणार आहेत. एकाच क्रमांकासाठी एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास त्यांची यादी कार्यालयीन नोटीस बोर्डवर प्रदर्शित करण्यात येईल.

rto
Shiv Sena Controversy: उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत नवा वाद पेटला; संपर्कप्रमुख मोठा की जिल्हाप्रमुख ?

लिलाव प्रक्रियेसाठीचे डीडी 16 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 2.30 वाजेपर्यंत स्वीकारले जातील, तसेच लिलाव त्याच दिवशी दुपारी 4.00 वाजता सभागृहात पार पडेल.

तसेच दुचाकी वाहनांसाठीचे अर्ज 16 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 10.30 ते दुपारी 2.30 दरम्यान सादर करावेत, त्यानंतर 17 ऑक्टोबर 2025 रोजी लिलाव दुपारी 4.00 वाजता सहकार सभागृहात आयोजित करण्यात येणार आहे.

rto
CJI Bhushan Gavai : सरन्यायाधीश गवईंनी 'PWD'विषयी नोंदवले महत्वाचे निरीक्षण; आधीचे अन् सध्याच्या कामांची केली तुलना...

डीडी कोणाच्या नावाने असावा

डीडी “RTO, Pune” यांच्या नावाने नॅशनलाइज्ड/शेड्युल्ड बँकेचा पुणे येथील असावा व दोन महिन्यांपेक्षा जुना नसावा. प्रत्येक क्रमांकासाठी केवळ एकच सीलबंद पाकीट ग्राह्य धरले जाईल. एकाच क्रमांकाकरिता एकापेक्षा जास्त पाकीटे आढळल्यास अर्ज बाद करण्यात येईल. लिलावात समान रकमेचे डीडी प्राप्त झाल्यास क्रमांक लॉटरी पद्धतीने (चिठ्ठ्या टाकून) निश्चित केला जाईल. लिलाव प्रक्रियेत अर्जदार उपस्थित असो वा नसो, प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल.

पसंती क्रमांक राखून ठेवण्याची वैधता 180 दिवस असून, आता NIC पोर्टलवर वैधता संपलेले क्रमांकही पुन्हा उपलब्ध होतात. फक्त पुणे (Pune) आरटीओ कार्यक्षेत्रातील पत्ता असलेल्या वाहनधारकांचेच अर्ज ग्राह्य धरले जातील. चुकीच्या रकमेचा डीडी, कार्यक्षेत्राबाहेरील पत्ता किंवा मोबाईल क्रमांक नोंद नसलेले अर्ज बाद करण्यात येतील.

rto
Sindhudurg ZP Election : बहुप्रतिक्षित गट व गण आरक्षण सोडतीनं सावंतवाडीत शिंदेंच्या शिवसेनेतील अनेकांचे पत्ते कट

लिलावानंतर उर्वरित पसंती क्रमांक ऑनलाईन पद्धतीने वितरित केले जातील. नागरिकांनी https://fancy.parivahan.gov.in या संकेतस्थळावर नाव व आधारशी संलग्न मोबाईल क्रमांक वापरून नोंदणी करून अर्ज व शुल्क भरून पसंती क्रमांक आरक्षित करता येईल. याकरिता कार्यालयात प्रत्यक्ष येण्याची गरज नाही. असे उप प्रादेशिक परिवहन यांच्याकडून कळविण्यात आल आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com