Gramsevak Certificate Scam : पुणे ZP मध्ये 11 ग्रामसेवक अपात्र : दिव्यांग प्रमाणपत्रांचा संशयास्पद प्रकार उघडकीस, नोकरी अन् सवलतींचीही चौकशी होणार

Pune ZP Gramsevak Disability Certificate Scam : पुणे जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागात दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे नियुक्ती मिळविलेले एकूण ६७ अधिकारी आणि कर्मचारी कार्यरत आहेत. यातील काही कर्मचाऱ्यांनी नियुक्तीच्या वेळी, तर काहींनी पदोन्नती किंवा बदलीसाठी ४० टक्क्यांपेक्षा अधिक दिव्यांगत्व असल्याची प्रमाणपत्रे सादर केली होती.
Pune ZP Disability Certificate Scam | 11 Gramsevak Disqualified
Pune ZP Disability Certificate Scam | 11 Gramsevak DisqualifiedSarkarnama
Published on: 
Updated on: 

Pune News, 03 Nov : दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे शासकीय नोकरी मिळवणे आणि विविध सवलतींचा लाभ घेण्याच्या प्रकारांवर आता प्रशासकीय यंत्रणेने लक्ष केंद्रित केले आहे. पुणे जिल्हा परिषदेत अशाच एका प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे. ग्रामपंचायत विभागातील तब्बल ११ ग्रामसेवक वैद्यकीय फेरतपासणीत ४० टक्के दिव्यांगत्वाच्या निर्धारित निकषात अपात्र ठरले आहेत. संबंधित कर्मचाऱ्यांचे दिव्यांगत्व १३ ते ३० टक्क्यांदरम्यान आढळल्याने त्यांनी सादर केलेल्या प्रमाणपत्रांच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

विशेष म्हणजे, या ग्रामसेवकांनी सेवेत दाखल होताना ४० टक्क्यांपेक्षा अधिक दिव्यांगत्व असल्याची प्रमाणपत्रे सादर केली होती. मात्र, उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार करण्यात आलेल्या वैद्यकीय फेरतपासणीत त्यांचे दिव्यांगत्व निर्धारित निकषांपेक्षा कमी असल्याचे समोर आले. त्यामुळे केवळ प्रमाणपत्रांचीच नव्हे, तर या प्रमाणपत्रांच्या आधारे मिळविलेल्या शासकीय लाभांचीही चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

ग्रामपंचायत विभागातील ६७ कर्मचाऱ्यांची तपासणी

पुणे जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागात दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे नियुक्ती मिळविलेले एकूण ६७ अधिकारी आणि कर्मचारी कार्यरत आहेत. यातील काही कर्मचाऱ्यांनी नियुक्तीच्या वेळी, तर काहींनी पदोन्नती किंवा बदलीसाठी ४० टक्क्यांपेक्षा अधिक दिव्यांगत्व असल्याची प्रमाणपत्रे सादर केली होती. मात्र, फेरतपासणीत ११ ग्रामसेवक निर्धारित निकषात अपात्र ठरल्याने जिल्हा परिषद प्रशासनासमोर नवा प्रश्न निर्माण झाला आहे.

Pune ZP Disability Certificate Scam | 11 Gramsevak Disqualified
Sangli Bank Result: गोपीचंद पडळकर सर्वांना पुरून उरले : सांगली जिल्हा बँकेचं मैदान मारलं, 20 मतांनी विजयी

नोकरी, पदोन्नती अन् सवलतींचीही चौकशी करा!

फेरतपासणीत अपात्र ठरलेल्या ११ ग्रामसेवकांनी दिव्यांग आरक्षणातून शासकीय नोकरी मिळवली होती का? पदोन्नती, बदली किंवा अन्य शासकीय सवलतींचा लाभ घेतला होता का? या बाबींची सखोल चौकशी करण्याची मागणी प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेने केली आहे.

Pune ZP Disability Certificate Scam | 11 Gramsevak Disqualified
Sangli Bank Result : सांगली जिल्हा बँकेत दिग्गजांना धक्के : सुमनताईंचा पराभव करत संजयकाकांची बाजी, अजित घोरपडेंचाही दणदणीत विजय

प्रशासनाकडून नोटिसा बजावणार

या प्रकरणाची गंभीर दखल जिल्हा परिषद प्रशासनाने घेतली आहे. वैद्यकीय फेरतपासणीत काही कर्मचाऱ्यांचे दिव्यांगत्व पूर्वी सादर केलेल्या प्रमाणपत्रांमधील टक्केवारीपेक्षा कमी आढळले आहे. संबंधित कर्मचाऱ्यांना नोटिसा पाठवून त्यांच्याकडून खुलासा मागविण्यात येणार आहे. खुलाशानंतर दोषी आढळणाऱ्यांवर प्रशासकीय नियमानुसार कारवाई केली जाईल, अशी माहिती पुणे जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भूषण जोशी यांनी दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.