Saurabh Rao : आयुक्तपदाचा पदभार हाती घेताच सौरभ रावांनी सांगितला विकासाचा प्लॅन

Thane Municipal Corporation ठाणे महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त सौरभ राव यांनी शुक्रवारी आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला. ठाण्याला सर्वोत्तम शहर करण्यासाठी प्रयत्न करणार असे म्हणत विकासाचा ॲक्शन प्लॅन सांगितला.
Saurabh Rao
Saurabh RaoSarkarnama
Published on
Updated on

Commissioner of thane municipal corporation : 'मी खूप भाग्यवान आहे, की ठाणे या ऐतिहासिक शहरात काम करण्याची संधी मिळाली. माझ्या आधी अभिजित बांगर, विपिन शर्मा यांनी जे काम केले आहे, त्या कामाला पुढे घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करण्याबरोबर सिटी ॲक्शन प्लॅन तयार करणार आहे. याशिवाय हे शहर राहण्यासाठीचे सर्वोत्तम शहर असावे, असा प्रयत्न करणार आहे. असे ठाणे महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त सौरभ राव यांनी शुक्रवारी आयुक्तपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. याचदरम्यान महापालिकेची आर्थिक स्थिती सुधारण्याबरोबर खर्चाचा भार कमी करण्यासाठीही प्रयत्न करणार आहे. याशिवाय उत्पन्नाचे विविध स्रोत शोधून त्यातून उत्पन्नवाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

प्रभारी महापालिका आयुक्त तथा ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी आयुक्तपदाची सूत्रे शुक्रवारी नवनियुक्त आयुक्त सौरभ राव (Saurabh Rao) यांच्याकडे दिले. त्यावेळी, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त (मुख्यालय) जी. जी. गोदेपुरे उपस्थित होते. 'शहरात वाढणारी लोकसंख्या आणि सोबतच शहराचा विकास करण्याचा प्रयत्न ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून करणार आहे. राज्य शासनाने माझ्याकडे महत्त्वपूर्ण अशी ठाणे शहराची जबाबदारी दिल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Saurabh Rao
MPSC Exam News : मोठी बातमी|MPSC ने नियोजित परीक्षा पुढे ढकलल्या; नवे वेळापत्रक कधी?

आतापर्यंत माझा जो प्रशासकीय अनुभव आहे, त्या प्रशासकीय अनुभवाच्या आधारावर निश्चितपणे या शहराला अद्ययावत सोयीसुविधांनी, राहण्यासाठी उत्तम शहर असेल अशा पद्धतीने विकास करण्याचा प्रयत्न करणार आहे. हे सर्व करताना नागरिकांची दैनंदिन जीवनशैली, अडीअडचणी म्हणजेच वाहतुकीचा विषय, पाण्याचा प्रश्न, ड्रेनेज, अतिक्रमण या विषयांवर प्रामुख्याने लक्ष केंद्रित करणार आहे. याचबरोबर पुढील 25 वर्षांत शहराचा विकास करण्यासाठी जे जे आवश्यक आहे किंवा जो वाव मला मिळेल तो दृष्टिकोन ठेवून एक ॲक्शन प्लॅन तयार करावा लागणार आहे. त्याच्या आधारावर सर्वांगीण असा शहराचा विकास होईल, हे करत असताना आपले जे प्रयत्न हे पर्यावरणपूरक असू शकतात. त्यातच टेरेस गार्डन तयार करणे अशा पद्धतीचे छोट छोटे उपक्रम करून कार्बन न्यूट्रल सिटी म्हणून विकास करण्यासाठी अशा उपक्रमांची मदत होते. हे करत असताना माझी वसुंधरा अभियानाची व्याप्ती कशी वाढविता येईल आणि युवा-तरुण पिढी, शालेय विद्यार्थी यांना या उपक्रमात कशा पद्धतीने सहभागी करून घेता येईल, यादृष्टीने प्रयत्न करणार असल्याचेही ते म्हणाले. latest Marathi News

कोण आहे सौरभ राव

ठाणे महापालिकेचे (Thane Municipal Corporation) नवनियुक्त आयुक्त तथा प्रशासक सौरभ राव हे भारतीय प्रशासन सेवेच्या 2003 च्या बॅचचे अधिकारी आहेत. ठाण्यात रुजू होण्यापूर्वी ते पुणे येथे सहकार आयुक्त या पदावर कार्यरत होते. राव हे मूळचे उत्तर प्रदेशचे आहेत. त्यांनी लखनऊ विद्यापीठातून राज्यशास्त्र या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यानंतर त्यांनी उत्तर प्रदेश येथे राज्य सेवेत तसेच भारतीय पोलिस सेवेत अधिकारी म्हणून काम केले. 2003 मध्ये राव प्रशासकीय सेवेत रुजू झाले. वर्धा जिल्ह्यात अतिरिक्त जिल्हाधिकारी या पदावरून प्रशासकीय सेवेची सुरुवात केली. त्यानंतर गोंदिया जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, नंदूरबारचे जिल्हाधिकारी, सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त आणि नागपूरचे जिल्हाधिकारी म्हणून कार्यभार सांभाळला. पुणे येथे जिल्हाधिकारी, पुणे महानगरपालिकेचे आयुक्त, साखर आयुक्त, पुण्याचे विभागीय आयुक्त म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. ठाण्यात येण्यापूर्वी ते सहकार आयुक्त म्हणून कार्यरत होते.

Edited By : Rashmi Mane

R

Saurabh Rao
Arvind Kejriwal Arrest By ED: केजरीवालांच्या अटकेनंतर राणेंनी ठाकरेंना डिवचलं, 'तो' फोटो ट्विट करत म्हणाले...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com