Teacher News: 'शिक्षकांसाठी AI साथी' ऑनलाईन कोर्सला दुसऱ्यांदा मुदतवाढ; SCERT चा निर्णय, 30 नोव्हेंबरची डेडलाईन

Shikshankasathi AI Sathi: SCERT द्वारे DIKSHA पोर्टलवरील 'शिक्षकांसाठी AI साथी' कोर्सला दुसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली आहे. सविस्तर बातमी वाचा.
Shikshankasathi AI Sathi:
Shikshankasathi AI Sathi:Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Pune News: शालेय शिक्षण क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात ‘एआय’ (AI) तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर वाढवण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या अत्यंत महत्त्वाकांक्षी ‘शिक्षकांसाठी AI साथी’ या ऑनलाईन कोर्सला राज्य सरकारने पुन्हा एकदा मुदतवाढ दिली आहे. ही मुदतवाढ दुसऱ्यांदा देण्यात आली आहे. ज्या शिक्षकांनी अद्याप या डिजिटल प्रशिक्षणात सहभाग घेतलेला नाही, त्यांना ३१ ऑक्टोबर २०२६ पर्यंत नोंदणी करण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र (SCERT) द्वारे दीक्षा (DIKSHA) पोर्टलवर हा कोर्स उपलब्ध करून देण्यात आला आहे. इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या सर्व अध्यापन करणाऱ्या शिक्षकांना आधुनिक शैक्षणिक तंत्रज्ञानाची ओळख व्हावी आणि अध्यापन पद्धती अधिक रंजक व्हावी, हा यामागील मुख्य उद्देश आहे.

नवीन सुधारित वेळापत्रक पुढीलप्रमाणे:

  • कोर्समध्ये प्रवेश (नोंदणी) घेण्याची अंतिम तारीख: ३१ ऑक्टोबर २०२६

  • कोर्स पूर्ण करण्याची अंतिम तारीख: ३० नोव्हेंबर २०२६

प्रशासकीय अधिकाऱ्यांना आदेश

SCERTच्या उपसंचालक (आयटी व प्रसार माध्यम विभाग) ज्योती शिंदे यांच्या सहीने हे सुधारित परिपत्रक जारी करण्यात आले आहे. यानुसार राज्यातील सर्व विभागीय उपसंचालक, शिक्षण विस्तार अधिकारी, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थांचे (DIECPD) प्राचार्य, तसेच महापालिका व बृहन्मुंबई महापालिकेचे शिक्षण अधिकारी आणि शिक्षण निरीक्षक यांना आपल्या कार्यक्षेत्रात विशेष जनजागृती करण्याचे निर्देश दिले आहेत.

Shikshankasathi AI Sathi:
Shiv Sena News: शिवसेना नेत्याच्या मुलाची हत्या; आजोबांनीच केला 'गेम', तपासात उलगडली मर्डर मिस्ट्री

ज्या शिक्षकांनी अद्याप दीक्षा ॲप/पोर्टलवर नोंदणी केलेली नाही, त्यांनी मुदतीत प्रवेश निश्चित करावा आणि ज्यांनी आधीच नोंदणी केली आहे त्यांनी ३० नोव्हेंबरपर्यंत कोर्स पूर्ण करावा, याची दक्षता घेण्यास सांगण्यात आले आहे.

Shikshankasathi AI Sathi:
Buldhana News: पोलीस ठाण्यासमोरच दोन गट भिडले! राष्ट्रवादी कार्यकर्त्यांसह शिवसेना नगरसेवकाचा मृत्यू, 7 जण जखमी

शिक्षण क्षेत्रात 'AI' चे वाढते महत्त्व

सध्याच्या डिजिटल युगात वर्गखोलीतील अध्यापन अधिक सोपे, रंजक आणि तंत्रज्ञानस्नेही करण्यासाठी 'शिक्षकांसाठी AI साथी' हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरत आहे. या प्रशिक्षणामुळे शिक्षकांना आधुनिक एआय टूल्सचा वापर करून धडे तयार करणे, शैक्षणिक साहित्य बनवणे आणि विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करणे सोपे होणार आहे. त्यामुळे राज्यातील सर्व शिक्षकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com