

सरकारी नोकरीची वाट पाहणाऱ्या लाखो तरुणांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली असून कर्मचारी निवड आयोगाने (SSC) तब्बल 12,256 पदांसाठी मेगाभरती प्रक्रिया सुरू केली आहे. पदवीधर उमेदवारांसाठी ही भरती करिअर घडवण्याची मोठी संधी मानली जात आहे.
SSC Combined Graduate Level (CGL) 2026 परीक्षेद्वारे केंद्र सरकारच्या अनेक मंत्रालये आणि विभागांमध्ये Group B आणि Group C पदांवर नियुक्ती केली जाणार आहे. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 21 मे 2026 पासून सुरू झाली असून अर्ज करण्याची अंतिम मुदत 22 जून 2026 रात्री 11 वाजेपर्यंत निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे अद्याप अर्ज न केलेल्या उमेदवारांनी तातडीने प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे.
SSC CGL ही देशातील सर्वाधिक लोकप्रिय स्पर्धा परीक्षांपैकी एक मानली जाते. या परीक्षेतून Income Tax Inspector, Assistant Section Officer (ASO), CBI Sub Inspector, Auditor, Accountant आणि Tax Assistant यांसारख्या प्रतिष्ठित पदांवर भरती केली जाते. आकर्षक वेतन, नोकरीची स्थिरता आणि पदोन्नतीच्या संधी यामुळे दरवर्षी लाखो उमेदवार या परीक्षेसाठी अर्ज करतात.
अर्जदारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असणे आवश्यक आहे. काही विशिष्ट पदांसाठी अतिरिक्त शैक्षणिक पात्रतेची अट लागू असू शकते. वयोमर्यादा साधारणपणे 18 ते 32 वर्षांदरम्यान ठेवण्यात आली आहे. मात्र पदानुसार वयोमर्यादेत बदल होऊ शकतो. तसेच SC, ST, OBC आणि इतर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार वयोमर्यादेत सवलत मिळणार आहे.
अर्ज शुल्क General, OBC आणि EWS प्रवर्गासाठी 100 रुपये ठेवण्यात आले आहे. SC, ST, महिला, PwBD आणि माजी सैनिक उमेदवारांना अर्ज शुल्कातून पूर्ण सूट देण्यात आली आहे. शुल्काचा भरणा UPI, नेट बँकिंग किंवा डेबिट कार्डद्वारे करता येईल.
इच्छुक उमेदवारांनी SSC च्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन नोंदणी पूर्ण करावी, अर्जातील सर्व माहिती भरावी, आवश्यक कागदपत्रे अपलोड करून शुल्क भरल्यानंतर अर्ज सादर करावा.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.