Sharad Pawar's NCP : शरद पवारांच्या राष्ट्रवादीला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तरी तारणार का?

Local Body Elections : लोकसभा निडणुकीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना जनतेनं साथ दिली. मात्र विधानसभा निवडणुकीत जनता भाजपच्या सोबत गेल्याने महाविकास आघाडीला म्हणावे तसे यश आले नाही.
Sharad Pawar
Sharad Pawarsarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर महाविकास आघाडी पुढे आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचं आव्हान आहे. मात्र या पराभवातून अजूनही महाविकास आघाडीतील पक्ष सावरलेला दिसत नाहीत. केवळ ठाकरे यांच्या शिवसेनेने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकला चलो ची भूमिका घेतली आहे. पण शेरद पवार गट किंवा काँग्रेसने कोणताही भूमीका स्पष्ट केलेली नाही. कोल्हापूर जिल्ह्याचा विचार केल्यास सध्या येथे काँग्रेस थोडी मजबूत स्थितीत असून शरद पवार यांच्याकडे जिल्हा हाताळणारा चेहरा दिसत नाही. त्यामुळे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तरी तारणार का? असा सवाल आता जिल्ह्यात उपस्थित केला आहे.

कोल्हापूर जिल्ह्याचा विचार केल्यास येथे काँग्रेसचे दोन विधान परिषदेचे आणि एक लोकसभेचे सदस्य आहेत. याशिवाय काँग्रेस नेते सतेज पाटील यांचे जिल्ह्याच्या राजकारणावर पकड आजही चांगली आहे. यामुळे काँग्रेससाठी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका काही प्रमाणात सोप्या जातील, अशी शक्यता आहे. पण राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात अजूनही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या हालचाली होताना दिसत नाहीत. नेतृत्वाची कमतरता असल्याचे दबक्या आवाजात चर्चाही जिल्ह्यात रंगली आहे.

जिल्ह्यात राष्ट्रवादीचे एक हाती नेतृत्व यापूर्वी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलं होते. पण त्यांनीच महायुतीची कास घरल्याने जिल्ह्यात आता त्यांचे आव्हान पेलणारे दुसरे नेतृत्व तयार झालेले नाही. यामुळेच लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मोठे आव्हान निर्माण झाले होते. पण काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली लोकसभेला सामोरे गेल्यामुळे महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार शाहू महाराज छत्रपती विजयी झाले.

Sharad Pawar
Sharad Pawar News : भालके 'बीआरएस'च्या वाटेवर; शरद पवारांनी एका वाक्यातच विषय संपवला

विजयानंतर राष्ट्रवादीलाही पूरक संधी मिळेल ही आशा बाळगून विधानसभा निवडणुकीत उमदे उमेदवार राष्ट्रवादीचे दिले. सध्या जिल्हाध्यक्ष व्ही बी पाटील असून ते राष्ट्रवादीचे नेतृत्व करत आहेत. पण निवडणुकीत इचलकरंजी वगळता चंदगड आणि कागलमध्ये महाविकास आघाडीला युतीचे उमेदवार आयात करावे लागले होते. मात्र ठिकाणीही त्यांचा दारून पराभव झाला.

अशा परिस्थितीत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे जिल्ह्यातील नेतृत्व गुण समजला जाणारा एक ही चेहरा सध्या उपलब्ध नाही. शाहू ग्रुपचे अध्यक्ष समर्जित घाटगे सध्या राष्ट्रवादीकडे चेहरा आहेत. पण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत ते रस दाखवतील याची शंका कमीच आहे.

इचलकरंजी महानगरपालिकेत पहिल्यांदाच निवडणूक होणार आहे. त्यामुळे विधानसभेचे उमेदवार मदन कारंडे हे या पालिकेच्या निवडणुकीत महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. पण कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत आत्तापर्यंत मंत्री हसन मुश्रीफ यांचाच हस्तक्षेप राहिला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्या पक्षाचे शहराध्यक्ष आर के पवार आणि जिल्हाध्यक्ष व्हीबी पाटील कती ताकद लावतात? या चेहऱ्यांना आताची राष्ट्रवादीतील नवी पिढी समजावून घेणार का? हे पाहावं लागणार आहे.

Sharad Pawar
Sambhajiraje Meets CM Pramod Sawant : संभाजीराजेंनी घेतली गोव्याच्या मुख्यमंत्र्यांची भेट; 'या' खास विषयावर झाली चर्चा

राज्याचा विचार केला तर सानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची जबाबदारी राष्ट्रवादीच्या १० आमदार आणि आठ खासदारांवर येणार आहे. मात्र कोल्हापुरात एक ही आमदार खासदार नसल्याने या निवडणुकीची जबाबदारी कुणाच्या खांद्यावर देणार हे देखील पहावे लागणार आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनाच कोल्हापूर जिल्ह्यावर लक्ष केंद्रित करावे लागेल, अशीच शक्यता निर्माण झाली आहे. शिवाय एकला चलो ची भूमिका घेतल्यास स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचा प्रभाव दिसणार का? हे देखील पहावे लागणार आहे.

तर जिल्ह्यातील एक कणखर नेतृत्व असणारे काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्या खांद्यावरच जबाबदारी देण्याची शक्यताही नाकारता येत नाही. मात्र जागा वाटपात काँग्रेस वरचढ ठरेल, अशाही भीती राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांना आहे.

Sharad Pawar
Satej Patil : "बदलापूरच्या घटनेनंतरही..." बीड, परभणीतील हत्या प्रकरणावरून सतेज पाटलांचा फडणवीसांवर हल्लाबोल

राष्ट्रवादीमधील असे चित्र पाहता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत जिल्हा पातळीवरील राजकारण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संगतीला जाण्याची शक्यता आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासाठी अनेकांनी मनोकामना व्यक्त केले आहेत. त्यामुळे अनेकांच्या अशा पल्लवीत झाल्याने आतापासूनच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत जुळवून घेतले जात आहे. तर होवू घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी अजितदादांच्या राष्ट्रवादीतून लढल्यास नवल वाटू नये अशीही शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com