Teachers strike : शिक्षक उतरणार रस्त्यावर; संप, मोर्चातून करणार सरकारची कोंडी; 'या' प्रश्नांमुळे वाढणार अडचण

Maharashtra teachers march News : महाराष्ट्र राज्य शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीने शिक्षक विद्यार्थी व शाळा यांच्या प्रमुख मागण्यासाठी राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे.
teacher
teacher sarkarnama
Published on
Updated on

Dharashiv News : महाराष्ट्र राज्य शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीने शिक्षक विद्यार्थी व शाळा यांच्या प्रमुख मागण्यासाठी 5 डिसेंबर 2025 रोजी राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनामध्ये महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ सक्रिय सहभागी होणार असल्याची माहिती प्राथमिक शिक्षक महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष बाळकृष्ण तांबारे यांनी दिली.

संपूर्ण राज्यामध्ये 2011 पूर्वी सेवेत दाखल झालेल्या शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षेतून सूट देणे (टीईटी ), जुनी पेन्शन योजना लागू करणे, शिक्षकांना 10,20,30 ची आश्वासित योजना लागू करणे, संच मान्यतेतील त्रुटी दूर करणे, शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख व मुख्याध्यापक यांच्या थांबवलेल्या पदोन्नती त्वरित करणे, शिक्षकांना (Teacher) फक्त अध्यापनाचीच काम देणे यासह विविध प्रश्नांसाठी एक दिवसीय लाक्षणिक संप व राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

teacher
Rohit Pawar : सयाजी शिंदेंना रोहित पवारांची साथ, नाशिकमधील वृक्षतोडीवरुन गिरीश महाजनांना घेरलं..

या एकदिवसीय लाक्षणिक संपात व जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येणाऱ्या मोर्चामध्ये महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाने सक्रिय सहभागी होण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती तांबारे यांनी दिली. 23 नोव्हेंबरला राष्ट्रीय प्राथमिक शिक्षक संघ व राज्य प्राथमिक शिक्षक संघाची शिक्षक संघाचे नेते संभाजीराव थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली ऑनलाइन बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये शिक्षक विद्यार्थी व शाळा यांच्या मागण्यासाठी होणाऱ्या राज्यस्तरीय आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवून आंदोलन यशस्वी करण्याचा निर्णय घेण्यात आला.

teacher
Mushrif–Ghatge Alliance : मुश्रीफ-घाटगे 'जोडी' विरुद्ध एकनाथ शिंदेंची एन्ट्री! कागलच्या रणांगणात फडणवीसांच्या प्लॅनला धक्का देणार?

शिक्षकांना सूट देणे गरजेचे : तांबारे

देशामध्ये प्राथमिक शिक्षण हक्क कायदा 1 एप्रिल 2010 मध्ये लागू झाला. त्या पूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये प्रादेशिक निवड मंडळामार्फत परीक्षा घेऊन गुणवत्तेवर शिक्षकांची निवड केली जात होती. 1 एप्रिल 2010 नंतर राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद भोपाळ (एनसीटीसी ) यांनी शिक्षकांची भरती करत असताना शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण असणे बंधनकारक केले पण एप्रिल 2010 पूर्वी जे शिक्षक सेवेत दाखल झालेले आहेत ते स्पर्धा परीक्षा देऊनच गुणवत्तेच्या आधारावर सेवेत दाखल झालेले असल्यामुळे त्यांना सूट देणे गरजेचे आहे, असे प्राथमिक शिक्षक महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष बाळकृष्ण तांबारे यांनी सांगितले.

teacher
BJP Vs NCP: तळेगावमध्ये 'बिनविरोध'चा महायुतीचा प्लॅन फसला; भाजप–राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा

या बैठकीस प्राथमिक शिक्षक संघाचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब मारणे, शिक्षक संघटना समन्वय समितीचे प्रदेशाध्यक्ष मधुकर काठोळे, राष्ट्रीय अध्यक्ष आबासाहेब जगताप, राष्ट्रीय नेते बाळासाहेब झावरे, राष्ट्रीय उपाध्यक्ष बाळकृष्ण तांबारे, राष्ट्रीय महासचिव म. ज. मोरे, राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष बलवंत पाटील, कैलास दहातोंडे, किसनराव ईदगे, विलास चौगुले, भक्तराज दिवाने, संतोष देशपांडे, आप्पाराव शिंदे, उत्तम वायाळ,राजेश हिवाळे, विजयकुमार गुत्ते, बाबुराव माडगे नांदेड, रामदास कावरखे हिंगोली, भगवान भालके जालना, भगवान पवार यांच्यासह राष्ट्रीय व राज्य कार्यकारिणीचे सर्व पदाधिकारी व राज्यातील सर्व जिल्हाध्यक्ष यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

teacher
Shivsena News : छत्रपती संभाजीनगरमध्ये शिंदेंच्या शिवसेनेला धक्का; महिला जिल्हाध्यक्षांचाच भाजपमध्ये प्रवेश!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com