Mushrif–Ghatge Alliance : मुश्रीफ-घाटगे 'जोडी' विरुद्ध एकनाथ शिंदेंची एन्ट्री! कागलच्या रणांगणात फडणवीसांच्या प्लॅनला धक्का देणार?
Kagal Politics : कागल नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने दोन कट्टर राजकीय शत्रू वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजीत घाटगे हे एकत्र आल्यानंतर राज्यात वेगळ्या राजकारणाची नांदी सर्वांना अनुभवता येत आहे. नेतेच नव्हे तर एकमेकाला पाण्यात बघणारे कार्यकर्तेही आता हातात हात घालून एकमेकांच्या प्रचाराला जाणार आहेत.
11 वर्षाचे हे शत्रू इतके जिवलग बनले कि एकमेकांच्या प्रचारासाठी थेट कार्यकर्त्यांना तंबी देऊ लागलेत. कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दोघांची मध्यस्थी करत मैत्री घडवून आणली आहे. त्यामुळे आता कोणत्याही परिस्थितीत कागल नगरपरिषदेचे मैदान मारायचं त्याचा निश्चय या जोडीने केला आहे.
दोघांचीही इज्जत पणाला लागल्याचे सांगत कोणत्याही कार्यकर्त्यांनी निगेटिव्ह चर्चा करायची नाही. अन्यथा बघून घेऊ, असा इशारा मंत्री मुश्रीफ आणि घाटगे यांनी दिल्यानंतर सर्वजण कामाला लागलेत. मात्र मंत्री मुश्रीफ आणि घाटगे यांची प्रतिष्ठा पणाला लावणारे विरोधक महायुतीतलेच शिवसेनेचे नेते माजी खासदार संजय मंडलिक. तितक्याच ताकतीने मैदानात उतरले आहेत.
लोकसभेला एकमेकांच्या विरोधात थांबणारे मुश्रीफ आणि घाटगे हे नगरपालिका निवडणुकीत एकमेकांसोबत प्रचार करताना दिसत आहेत. त्यामुळे एकाकी पडलेले माजी खासदार संजय मंडलिक या दोघांच्या विरोधात रिंगणात उतरले. लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्याने मंडलिक गट सध्या राजकारणापासून काही अंतर दूर आहे. पुन्हा नगरपालिका जिंकण्यासाठी मंडलिक गट त्वेषाने कामाला लागला आहे.
मुश्रीफ आणि घाटगे गटाच्या पाठीवर अदृश्य शक्तीचा हात आहे. पण आता मंडलिक गटाच्या मागे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हात असणार आहे. मंडलिक यांच्यासाठी स्वतः एकनाथ शिंदे कागलच्या मैदानात प्रचारासाठी उतरणार आहेत. येत्या 28 किंवा 29 नोव्हेंबरला कागलमध्ये शिंदे यांची सभा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लावलेल्या जोडण्या यशस्वी होतात की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा मंडलिक गटासाठी फायदेशीर ठरणार? हे येत्या 3 सप्टेंबरला कळणार आहे.
महिनाअखेरला शिंदेंची सभा
कागल नगरपालिकेतील उमेदवारांनी माजी खासदार संजय मंडलिक यांच्या उपस्थितीत रविवारी कोल्हापूर दौऱ्यावर आलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान माजी खासदार संजय मंडलिक यांनी प्रचारासाठी आपण कागलला येण्याचं निमंत्रण दिल. या भेटीदरम्यान शिंदे यांनी कागलमध्ये येण्याचा आश्वासन मंडलिक यांना दिले. त्यामुळे येत्या 28 किंवा 29 तारखेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तोफ कागलमध्ये धडाडण्याची शक्यता आहे. त्यामुळे कागलच्या राजकारणाला पुन्हा एकदा रंग देणार आहे हे नक्की.
फडणवीस-शिंदे अंतर वाढणार
एकीकडे घाटगे-मुश्रीफ एकत्र आल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. तर सर्वसामान्य देखील सोयीस्कर राजकारणाला कंटाळलेला दिसतो. भले हे कार्यकर्ते एकमेकांच्या तोंडावर बोलत नसले तरी खासगीत त्यांची नाराजी उघड होत आहे. त्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कागल मध्ये सभा घेण्याची शक्यता असल्याने कागल नगरपालिकार्ट कुणाकडे झुकणार हे पहावे लागणार आहे. तर दुसरीकडे राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात दुरावा निर्माण झाल्याचं सांगितले जाते. त्यामुळे कागल नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने यांच्यातील अंतर किती आहे हे स्पष्ट दिसणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.
