Maharashtra Politics : छत्रपती संभाजी महाराज नावाने ३४४ कोटींचा नवा विकास आराखडा तयार

स्वराज्यरक्षक की, धर्मवीर उपाधी लावावी यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमधील मतभेद चांगलेच टोकाला गेले होते.
Maharashtra Politics
Maharashtra Politics Sarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Politics : स्वराज्यरक्षक की, धर्मवीर उपाधी लावावी यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमधील मतभेद चांगलेच टोकाला गेले होते. हा वाद काहीसा शांत होत नाही तोच आता शिंदे-फडणवीस सरकारने शिरुरमधील छत्रपती संभाजी महाराज समाधीचा ३४४.४८ कोटींचा नवा विकास आराखडा बनवला आहे. १५ फेब्रुवारीला शिंदे-फडणवीसांच्या अंतिम मंजुरीसाठी तो सादर करण्याचा निर्णय घेतला आहे.

विशेष म्हणजे या संपूर्ण आराखड्याच्या नावाचा प्रारंभच धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज असा करुन छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीरच असे ठसविण्याचा आणि विरोधकांना थेट डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. सदर आराखडा तयार असून त्याची अंतिम मंजुरी १५ तारखेला होणार असल्याची माहिती माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांनी 'सरकारनामा'शी बोलताना दिली.

Maharashtra Politics
P. T. Usha: 'तीन' ऑलिम्पिक गाजवणारी 'उडन परी' राज्यसभेची अध्यक्ष ; पाहा फोटो

वढुबुद्रुक (ता.शिरूर) व तुळापूर (ता.हवेली) येथे प्रस्तावित असलेला सुधारीत (अद्ययावत) धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारक विकास आराखडा अखेर ३८४.४८ कोटी एवढ्या रकमेचा निश्चित झाला असून त्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांपुढे त्याचे अंतिम सादरीकरण १५ तारखेला मुंबईत होणार असल्याची माहिती आढळराव यांनी दिली.

वढू-तुळापूर येथील संभाजी महाराज स्मारक विकास आराखडा पूर्वीच्या सरकारने २६९ कोटींचा केला होता. मात्र यात काही महत्वपूर्ण बदल, सुधारणा करुन विकास आराखडा नव्याने बनविण्याचा निर्णय झाला. त्यानुसार प्रशासनाकडून यासाठी स्थानिक ग्रामस्थ, ग्रामपंचायत व शंभूप्रेमींच्या महत्वपूर्ण सूचना मागवण्यात आल्या होत्या. त्यानुसार नव्याने विकास आराखडा अंतिम स्तरापर्यंत आणला असून तो सुमारे १४ कोटींनी वाढल्याचे आढळराव यांनी सांगितले.

Maharashtra Politics
Praniti Shinde News : काँग्रेस-राष्ट्रवादीत वाद पेटला : प्रणिती शिंदे म्हणतात, ‘कोण रोहित पवार..? पोरकटपणा असतो काही लोकांत...’

या नवीन आराखड्यात स्मारकापर्यंत पोहोचण्याचा महत्त्वाचा मार्ग असलेल्या वढु-आपटी मार्गावर असलेल्या भीमा नदीवर मोठा पूल बांधण्यात येणार आहे. यासाठी सुमारे २७ कोटी प्रस्तावित करण्यात आले असून आपटी-वढू बुद्रुकसह जोडरस्त्यांचे रुंदीकरणासाठी सुमारे ६० कोटी प्रस्तावित केले आहेत. वरील दोन्ही कामांमुळे आता संपूर्ण राज्यभरातून येणा-या मोठ्या संख्येच्या शंभूभक्तांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार नाही याची विशेष खबरदारी नव्या आराखड्यात घेण्यात आल्याचेही आढळराव यांनी सांगितले.

सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता बी.एन.बहिर यांच्याकडून सदर अंतीम आराखडा सादरीकरण केले असून १५ तारखेला किंवा त्याआधीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांच्या उपस्थितीत सादरीकरण होवून सदर आराखड्याला अंतीम मंजुरी दिली जाईल.

असे केलेय निधी प्रस्तावन : (सर्व रक्कम कोटीत + १८ टक्के जीएसटी वेगळा)

- इमारत-भव्य शिल्प-प्रवेशद्वार-अ‍ॅंपीथिएटर : वढु बुद्रुक (३०.९५) तुळापुर (४५.९२)

- घाट बांधकाम : वढु बुद्रुक (२३.१४) तुळापुर (३५.९०)

- संग्रहालय-प्रकाश ध्वनी शो-प्रेक्षागृह : वढु बुद्रुक (५.००) तुळापुर (१०.५५)

- पायाभूत सुविधा (लाईट-सोलर-पाणी इ.) : वढु बुद्रुक (२७.५०) तुळापुर (३४.६६)

- अस्तीत्वातील समाधी जिर्णोध्दार : वढु बुद्रुक (१.५०) तुळापुर (१.५०)

- भू-संपादन : वढु बुद्रुक येथील केईएम जागा अधिग्रहण (२.१५)

- भिमा नदीवरील तुळापूर-आपटी पूल दृष्य सज्जासह : (३५.९४)

- आपटी-वढु बुद्रुक रस्ता रुंदीकरण : (७९.३०)

नवीन आराखड्यातील प्रमुख बदल

- नाव : स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज ऐवजी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज

- लष्करी भरती व शिवकालीन युध्द तंत्र प्रशिक्षण केंद्र, ऐतिहासिक शिवकालीन शस्त्रास्त्र संग्रहालय

- छत्रपती शहाजी महाराज ते महादजी मराठा वीर पुरुषांची तेजस्वी स्मृती मालिका दालन

- छत्रपती संभाजी महाराज संबंधित सर्व ऐतिहासिक कागदपत्रे, जिवनचरित्र ग्रंथ व संशोधन केंद्र

- स्वधर्मे निधनं श्रेया परोधर्मो भयावह: हे छत्रपती संभाजी महाराजांशी संबंधित वचन महामार्गावर उभे करणे

- भव्य हिंदवी स्वराज्य ध्वज तथा भगवा झेंडा उभारणी

- छत्रपती संभाजी महाराजांचा जिवनपट उलगडविणारा माहितीपट-चित्रपट दाखविण्याची कायमची व्यवस्था

Maharashtra Politics
Rajan Patil News : राजन पाटलांच्या मनात नेमकं काय? चर्चा भाजप प्रवेशाची; पण हजेरी राष्ट्रवादीच्या बैठकीला

के.ई.एम. रिसर्च सेंटर स्थलांतर होणार

गेली अनेक वर्षे पुण्यातील के.ई.एम हॉस्पिटल संस्थेचे रिसर्च सेंटर वढु बुद्रुक येथे सुरू होते. मात्र छत्रपती संभाजी महाराजांच्या मुख्य समाधी स्थळाला विस्तीर्ण परिसर मिळावा या उद्देशाने या संस्थेचे सेंटरचे स्थलांतर केले जाईल. के.ई.एम रिसर्च सेंटरसाठी कोणती जागा दिली जाणार याबाबतची माहिती प्रशासनाकडून योग्य वेळी दिली जाणार असल्याचेही आढाळरावांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com