Aadhalrao Patil Vs Kolhe : आंबेगावसाठी एक रुपयाचा निधी त्यांनी आणला नाही ! आढळराव पाटलांची खासदार कोल्हेंवर टीका

Shirur Lok Sabha Constituency : पाच वर्षांत मतदारसंघाचे वाटोळे केले, शिवाजीराव आढळराव पाटलांची खासदार अमोल कोल्हेंवर टीका...
Dr. Amol Kolhe-Shivajirao Adhalrao Patil
Dr. Amol Kolhe-Shivajirao Adhalrao PatilSarkarnama

Aambegaon News : शिरूर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि महायुतीकडून निवडणूक लढविणारे शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यातील शीतयुद्ध संपण्यात तयार नाही. हे दोन्ही उमेदवार एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. केंद्रात सत्ता असलेला खासदार दिला तर निधी येतो. विरोधातील खासदार दिला तर मागच्या पाच वर्षांसारखं मतदारसंघाचे वाटोळे होतं, अशा शब्दांत महायुतीचे उमेदवार आढळराव पाटील यांनी कोल्हेंवर टीकास्त्र सोडले.

महाराष्ट्रातील (Maharashtra) लोकसभेच्या 48 जागांसाठी निवडणूक होणार आहे. पाच टप्प्यात या निवडणुसाठी मतदान होणार आहे. पुण्यात जिल्ह्यात समावेश होत असलेल्या बारामती लोकसभेसाठी 7 मे रोजी तर शिरूर, मावळ आणि पुणे शहर या मतदारसंघासाठी 13 मे रोजी मतदान होत आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघातील लढतीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्याकडून खासदार कोल्हे यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे, तर महायुतीच्या जागा वाटपामध्ये हा मतदारसंघ अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Dr. Amol Kolhe-Shivajirao Adhalrao Patil
Sunetra Pawar News : माजी खासदार म्हणतात, "सुनेत्रा तू सर्वात चांगली सून आहेस!"

या मतदारसंघातून कोल्हे यांच्या विरोधात नक्की कोण निवडणूक लढविणार, याबाबत सुरुवातीपासूनच मोठी उत्सुकता होती. अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे सक्षम उमेदवार नसल्याने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमधील इच्छुक आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना राष्ट्रवादीमध्ये प्रवेश देऊन उमेदवारी दिली आहे. निवडणूक जाहीर झाल्यापासून या दोन्ही उमेदवारांमध्ये जोरदार आरोप- प्रत्यारोप सुरू आहेत. आंबेगाव तालुक्यात गावभेट दौऱ्यावर असताना आढळराव पाटील यांनी खासदार कोल्हेंना पुन्हा एकदा लक्ष केलं आहे.

भीमाशंकर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, जिल्हा परिषदेचे (ZP) सदस्य विवेक वळसे पाटील, शिवसेना गटनेते देविदास दरेकर, अरुण गिरे, सुनिल बाणखेले, विष्णू काका हिंगे, पंचायत समिती सदस्य रवींद्र करंजखेले, उद्योजक संतोष डोके, राष्ट्रवादी काँग्रेस आंबेगाव कार्याध्यक्ष निलेश थोरात, युवासेना जिल्हाप्रमुख प्रवीण थोरात, युवासेना राष्ट्रिय कार्यकारीणी सदस्य सचिन बांगर, युवानेते अजितशेठ चव्हाण, सचिनभाऊ भोर, भाऊसाहेब भापकर, सरपंच गोपाळराव गवारी, माजी सरपंच वैभव थिटे, उपसरपंच लताताई उंडे, उद्योजक किसान शेठ उंडे, तबाजी शेठ उंडे आदी या वेळी उपस्थित होते.

Dr. Amol Kolhe-Shivajirao Adhalrao Patil
Ajit Pawar : सुजय विखेंचा अर्ज भरण्यासाठी अजितदादांची दांडी; तर भाजपचे शिंदेंच्या शिलेदारांकडे दुर्लक्ष

इतका निर्ढावलेला माणूस एकनिष्ठ आणि संसदरत्नच्या बाता मारतो. मात्र काम काडीचे नाही, संपर्क नाही कुठल्या जोरावर कोल्हे निवणुकीला उभे राहिलेत, असा सवाल आढळराव पाटीलांनी उपस्थित करत 'पब्लिक सब कुछ जाणती है, असा टोला कोल्हेंना लगावला. केंद्रातला एकही रुपयाचा निधी आंबेगाव तालुक्यात आणला नाही. चाकण, तळेगाव, शिक्रापूरचा वाहतूक प्रश्नही जशाच तसा राहिला, असं म्हणत आढळरावांनी खासदार कोल्हे यांनी मतदारसंघाचे वाटोळे केल्याचा आरोप केला.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com