Aba Bagul News : बागुलांचा तिन्ही दगडांवर पाय? काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी - शरदचंद्र पवार पक्षासह अपक्ष म्हणून अर्ज दाखल!

Parvati Vidhansabha Constituency: विधानसभा निवडणुकीसाठीच्या जागा वाटपाचा महाविकास आघाडी मधील तिढा अद्यापही पूर्णपणे सुटलेला नाही.
Aba Bagul
Aba Bagul Sarkarnama
Published on
Updated on

Pune Political News: विधानसभा निवडणुकीसाठी आजपासून अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. उमेदवारांकडून अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे.मात्र तरीही अद्याप काँग्रेसकडून उमेदवार यादी जाहीर करण्यात आलेली नाही. अशातच विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी काँग्रेसकडून इच्छुक असलेल्या पर्वती विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आबा बागुल यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी - शरदचंद्र पवार पक्ष आणि अपक्ष असे तीन अर्ज दाखल केले आहेत.

विधानसभा निवडणुकीसाठीच्या जागा वाटपाचा महाविकास आघाडी(Mahavikas Agahdi) मधील तिढा अद्यापही पूर्णपणे सुटलेला नाही. पुणे शहरातील आठ विधानसभा मतदारसंघांपैकी कोणती जागा कोणाच्या वाट्याला येणार याबाबत अद्याप एकमत झालेलं नाही. त्यामुळे शहरातील इच्छुकांमध्ये प्रचंड अस्वस्थता पाहायला मिळत आहे.

पर्वती विधानसभा मतदारसंघाचा विचार केल्यास या मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून अश्विनी कदम या इच्छुक आहेत. तर हा विधानसभा मतदारसंघ काँग्रेस आपल्याकडे ठेवण्यासाठी प्रयत्नशील आहे. हा विधानसभा मतदारसंघ आपल्याकडे ठेवून काँग्रेस बागुल यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवण्यासाठी आग्रही आहे. मात्र ही जागा कोणाला सुटणार आहे याबाबत अद्यापही एकमत झालेला नाही.

Aba Bagul
Ranjit Shirole : राज ठाकरेंना पुण्यात मोठा धक्का; रणजित शिरोळे यांचा मनसेला जय महाराष्ट्र

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले(Nana Patole) यांनी काँग्रेस इच्छुकांची संभाव्य यादी ही उद्या सायंकाळपर्यंत येणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. मात्र त्यापूर्वीच आबा बागुल यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. हे उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांनी एक अर्ज काँग्रेस कडून दुसरा अर्ज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून तर तिसरा अर्ज अपक्ष म्हणून दाखल केला आहे.

Aba Bagul
Nana Patole : काँग्रेसची पहिली यादी कधी जाहीर होणार? नाना पटोलेंनी सांगितला मुहूर्त

त्यामुळे काँग्रेस(Congress)कडून उमेदवारी मिळाली तर ठीक अथवा वेळ पडल्यास राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून देखील निवडणूक लढवण्याची आबा बागूल यांची तयारी असल्याचं स्पष्ट होत आहे. तसेच महाविकास आघाडीकडून उमेदवार मिळाली नाही तरी देखील आपण अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरण्याचे निश्चित असल्याचं बागुल यांच्या या कृतीतून दिसून येत असल्याचं बोललं जात आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com