Pune News : महाविकास आघाडीतील मित्र पक्षांमध्ये जागा वाटपाची खलबत्ता अद्यापही सुरू आहे. जागा वाटपामध्ये एकमत न झाल्याने अद्याप काँग्रेसची पहिली यादी जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे ही यादी कधी येणार याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे. आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यादी कधी येणार, यावर खुलासा केला आहे.
नाना पाटोले म्हणाले, महाविकास आघाडीच्या जागा वाटपामध्ये काही जागांबाबत चर्चा अजुनही सुरू आहे. आमच्या जागा वाटपाबाबत महायुतीतील नेते टीका करत असले तरी त्यांच्या तिथे सारं काही आलबेल नाही. त्यांच्या सगळ्या गोष्टी तिकडे दिल्लीमध्ये ठरत आहे.
आघाडीमध्ये शेवटच्या दिवसापर्यंत एक एक जागेवर चर्चा होत असते. त्यामुळे वाटाघाटी मध्ये सर्व जागांचा प्रश्न निकाली निघेल, असा विश्वास नाना पटोले यांनी व्यक्त केला.
आज (गुरुवारी) काँग्रेसच्या उमेदवारांची यादी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पाठवणार आहे. उद्या (शुक्रवार) सायंकाळपर्यंत काँग्रेसची उमेदवार यादी फायनल होऊन ती जाहीर करण्यात येईल, असे पाटोले यांनी सांगितले.
निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्रिपदाची चर्चा करणे योग्य नाही. आत्ता महाराष्ट्र वाचवणं हे आमचं प्रथम दायित्व आहे. यासाठी सर्व आघाडीचे नेते काम करत असून मुख्यमंत्रिपदाची निवड ही लोकांतून निवडून आल्यानंतर करण्यात येईल. त्यामुळे आता मुख्यमंत्रिपदाच्या चर्चांवर पूर्णविराम देणे आवश्यक असल्याचे पाटोलें यांनी सांगितलं.
सध्या सत्तेमध्ये बसलेली लोक हे डाकू आहेत. निवडणूक प्रक्रिया सध्या सुरू झाली असताना मतदान ही झाले नसताना यांनी सत्तेत कोण येणार आहे. हे जाहीर करून टाकले आहे. यातून यांची डाकू प्रवृत्ती समोर येत असल्याची टीका पटोलेंनी केली.
संजय राऊत यांनी शिवसेना ठाकरे पक्ष 100 जागा लढवणार असल्याचे सांगितले आहे. यावर नाना पाटोले यांनी संजय राऊत यांना टोला लागावला. राऊत यांना जास्त
सीरियसली घेण्याची गरज नसल्याची सांगितले आहे. तसेच ज्यांची काँग्रेसकडून उमेदवारी निश्चित झाली आहे. त्यांना आम्ही फॉर्म भरण्याच्या सूचना देखील दिल्या असल्याचे नाना पाटोले यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.