पुणे : गेल्या काही दिवसांपासून पुण्याचा पालकमंत्री कोण होणार? आणि पुण्यातून लोकसभा देवेंद्र फडणवीस लढवणार का? याबाबत जोरदार चर्चा रंगत आहेत. याबाबत अनेक तर्कही लावले जात होते. पुण्याचे पालकमंत्री हे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच (Devendra Fadnavis) होणार, असे बोलले जात होते आणि याबाबत अनेक समीकरणंही रंगवले जात होते. मात्र, याबाबत आज (ता.२ सप्टेंबर) फडणवीसांनीच स्पष्टीकरणं दिलं असून मी पुण्याचा पालकमंत्री होणार नाही आणि लोकसभाही लढवणार नाही,असे जाहीर केले आहे.
पुण्यात आज ई-बसेसच्या चार्जिंग स्टेशनचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमानिमित्त ते पुण्यात आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. (Devendra Fadnavis Latest News)
पुण्याचा पालकमंत्री कोण होणार याबाबत होणाऱ्या चर्चांना आज फडणवीसांनी स्पष्ट शब्दात उत्तर देत या चर्चांना पुर्णविराम दिला आहे. नव्या सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार झाल्यानंतर फडणवीस आणि मंत्री चंद्रकात पाटील हे शिरूर येथे माजी आमदार बाबूराव पाचर्णे यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांना शिक्रापूर परिसरातील पदाधिका-यांनी गराडा घातला आणि काही प्रश्न चंद्रकांत पाटलांना सांगण्याचा प्रयत्न करत होते. यावेळी पाटील यांनी तुम्ही आता पुढे व्हा अन् बोला तुमच्या पालकमंत्र्यांशी..अशी सूचना य़ेथील पदाधिकाऱ्यांनी केली होती. तेंव्हापासून फडणवीस हे पुण्याचे पालकमंत्री होणार, अशी जोरदार चर्चा सुरू झाली होती. त्या चर्चेवर आज फडणवीसांनी पुर्णविराम देत मी पुण्याचा पालकमंत्री होणार नाही. आणि पुण्यातून लोकसभाही लढवणार नाही,असे जाहीर केले आहे. तुम्हाला मी महाराष्ट्रात नकोय का?, असा मिश्किल सवाल त्यांनी माध्यम प्रतिनिधींना केला. का मी पुण्यातून लोकसभा लढवणार, असे म्हणता असेही ते म्हणाले.
गेल्या काही दिवसांपासून फडणवीसांनी आगामी लोकसभा निवडणूक ही पुण्यातून लढवावी किंवा लढवणार,अशा चर्चा होत होत्या. त्यातच अखिल भारतीय ब्राह्मण महासंघानेही भारतीय जनता पक्षाचे (BJP) राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांना पत्र लिहून त्यांनी पुण्यातून लोकसभा लढावी, अशी मागणी केली होती. यामुळे या चर्चांना अजूनच उत आला होता. मात्र आज फडणवीसांनी यावर उत्तर देत त्या थांबवल्या आहेत.
दरम्यान, पुण्यात आज पीएमपी इलेक्ट्रीक बसेस आणि चार्जिंग स्टेशन्सच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी ते पुण्यात आले होते. यावेळी त्यांनी माध्यामांशी संवाद साधला. मी महाराष्ट्रात तुम्हाला नकोय का? मी पुण्याचा पालकमंत्री होणार नाही. या फक्त माध्यमातील चर्चा आहे. तुम्ही का मला पुण्यातून लोकसभा लढवण्याबाबत बोलता,असा सवाल त्यांनी केला. याबरोबरच मंत्री मंडळाच्या विस्तराबाबत विचारले असता, मंत्री मंडळ विस्तार लवकरच होईल, असेही ते म्हणाले. तर काँग्रेसच्या मंत्र्यांची मंत्री मंडळात वर्णी लागणार का? या प्रश्नावर त्यांनी मात्र मौन पाळले. तसेच, अशोक चव्हाण आणि माझी भेट झालेली नाही. आम्ही गणपती निमित्त एका कार्यक्रमाच्या ठिकाणी एकत्र आलो होतो,असेही त्यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.