ACB चे SP तांबे अॅक्शन मोडवर..`सर्कल`ला लाच घेताना पकडले...

ACB : २ डिसेंबरला पुणे सत्र न्यायालयातील वरिष्ठ लिपिकाला दीड लाखाची लाच घेताना पकडले होते.
ACB SP Amol Tambe Latest News
ACB SP Amol Tambe Latest NewsSarkarnama
Published on
Updated on

पिंपरी : अमोल तांबे (Amol Tambe) यांनी पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे (ACB) पोलिस अधिक्षक (SP) म्हणून कार्यभार घेताच कारवाईचा धडाकाच लावला आहे. त्यातही मोठे मासे ते गळाला लावत आहेत. आज मावळ तालुक्यात आढले बुद्रूक येथील तलाठी कार्यालयातच वीस हजार रुपयांची लाच घेताना शिवणेच्या मंडल अधिकारी (सर्कल) संगीता राजेंद्र शेरकर (वय ५४) यांना पकडण्यात आले. (ACB SP Amol Tambe Latest News)

ACB SP Amol Tambe Latest News
संजय राठोडांचा विषय चित्राताईंची पाठ सोडेना...

संभाजी नारायण लोहोर (वय ५२, रा.भडवली, ता. मावळ) या त्यांच्या एजंटलाही एसीबी पथकाने अटक केली आहे. २ तारखेला एसीबीच्या पुणे युनीटने आठवड्यापूर्वी ४२ लाख रुपयांची लाच मागणाऱ्या महिला तहसीलदारांसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. तर, २ डिसेंबरला पुणे सत्र न्यायालयातील वरिष्ठ लिपिकाला दीड लाखाची लाच घेताना पकडले होते.

ACB SP Amol Tambe Latest News
पवार म्हणाले, ‘४८ तासांत हल्ले न थांबल्यास मी बेळगावला जाईन’ अन॒ ३६ वर्षांपूर्वीच्या आठवणी झाल्या ताज्या!

काल भोर एसटी आगार व्यवस्थापक आणि एका चालकाला चार हजाराची लाच घेतल्याबद्दल कारवाई केली होती. तर,आज त्यांनी लाचखोर सर्कलला अटक केली. भडवलीत (ता.मावळ) खरेदी केलेल्या जमिनीच्या सातबाऱ्यावर मालकाचे नाव लावण्यासाठी त्यांच्याकडे सर्कलबाईं व लोहोर याने वीस हजाराची लाच मागितली. तसेच ती थेट तलाठी कार्यालयातच स्वीकारण्याचे धाडस आज केले. याबाबत वडगाव मावळ पोलिस ठाण्यात लाचखोरीचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे. एसीबी पुणे युनीटचे पीआय श्रीराम शिंदे पुढील तपास करीत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com