Daund NCP News : राष्ट्रवादीला कायम लीड देणाऱ्या गावात कुलांचा थोरातांना 'दे धक्का' : निष्ठावंत कार्यकर्त्यांचा भाजपत प्रवेश

दौंड विधानसभा, पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीत सर्व राजकीय तंत्रांचा आणि डावपेचांचा वापर करूनही आत्तापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मळद गावामधून कायमच लीड मिळत गेला आहे.
Rahul Kul
Rahul Kul Sarkarnama

कुरकुंभ (जि. पुणे) : दौंड तालुक्यात अनेक वेळा राजकीय उलथापालथ, पैसा आणि वेगवेगळ्या राजकीय डावपेचांचा वापर होऊनही राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) आणि स्थानिक नेत्यांना निवडणुकांमध्ये लीड देणाऱ्या मळद गावात भारतीय जनता पक्षाचे (BJP) आमदार राहुल कुल (Rahul Kul) यांनी माजी आमदार रमेश थोरात (Ramesh Thorat) अर्थात राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार पाडले आहे. मोरे-भगतवस्तीवरील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आमदार कुल यांच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये प्रवेश केला आहे. (Activists from Daund who believed in NCP joined BJP)

दौंड विधानसभा, पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीत सर्व राजकीय तंत्रांचा आणि डावपेचांचा वापर करूनही आत्तापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मळद गावामधून कायमच लीड मिळत गेला आहे. त्यावरून भारतीय जनता पक्षाचे आमदार राहुल कुल हे त्यांच्या स्थानिक कार्यकर्त्यांकडे नेहमीच खंत व्यक्त करायचे. मात्र, नुकतेच झालेल्या हनुमत जयंतीच्या दिवशी आरतीसाठी मोरे-भगतवस्ती आलेले भाजपचे आमदार राहुल कुल यांनी परिसरातील ग्रामस्थांना विशेषतः राष्ट्रवादीला मानणाऱ्यांना पक्षात घेऊन माजी आमदार रमेश थोरात यांना जोरदार धक्का दिला आहे.

Rahul Kul
BJP-Congress Dispute News : हॉर्न वाजविण्यावरून काँग्रेस-भाजप कार्यकर्ते भिडले : तुफान दगडफेक, सहा जखमी, १२० जणांवर गुन्हे

मळद येथील राष्ट्रवादीच्या स्थानिक व तालुका पातळीवरील नेतेमंडळींची बोटचेपी भूमिका, स्वार्थी राजकारणाला कंटाळून मोरे-भगतव स्तीवरील कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसशी एकनिष्ठ राहिलेल्या ग्रामस्थांनी भाजपत घेऊन आमदार कुल यांनी राष्ट्रवादीला जोरदार धक्का दिला आहे. त्याचा परिणाम आगामी निवडणुकांमध्ये दिसून येण्याची शक्यता आहे. या पक्षप्रवेशामुळे भाजपला फायदा, तर राष्ट्रवादीला मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Rahul Kul
Former CM Car Accident : नशीब बलवत्तर....एअरबॅग उघडली अन्‌ माजी मुख्यमंत्री थोडक्यात बचावले!

या प्रसंगी आमदार राहुल कुल यांच्या उपस्थित सागर भगत, विशाल मोरे, कुलदीप भगत, प्रशांत मोरे, उमेश मोरे, आदित्य मोरे, सुनील मोरे, रणजित मोरे, प्रतिक मोरे, नितीन भगत संतोष भगत जयदिप भगत मोहन भगत, सोनबा भगत, महेश भगत, स्वप्नील भगत, दत्ता भगत आदी राष्ट्रवादीला मानणाऱ्या ७० ते ८० कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

Rahul Kul
Sharad Pawar Announcement : राष्ट्रवादी कर्नाटक विधानसभेची निवडणूक लढवणार; पण मोजक्या जागांवर : शरद पवारांची घोषणा

या पक्ष प्रवेशप्रसंगी भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष बापूराव भागवत, मळदचे प्रभारी सरपंच विनोद शितोळे, खरेदी विक्री संघाचे माजी उपाध्यक्ष मनोहर जाधव, विष्णू दुधे, संतोष म्हेञे, कालीदास रणवरे, संजय साळवे, बापूराव शहाणे, प्रदीप झुरूंगे आदी मान्यवर उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com