

Pune Crime पुणे : महिलेला पोलिस चौकीत बोलावून जबर मारहाण करणाऱ्या पोलिसावर पंधरा दिवसांनंतर विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुल शिंगे असे गुन्हा दाखल झालेल्या पोलिसाचे नाव आहे. याप्रकरणी पन्नास वर्षीय व्यापारी महिलेने विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्याने त्याची दुचाकी फिर्यादी महिलेच्या दुकानासमोर असलेल्या रस्त्यावरच उभी केली. त्यावर संबंधित महिलेने शिंगेला दुचाकी बाजूला घेण्यास सांगितली. पण त्याने महिलेशी हुज्जत घालत, त्यांना शिवीगाळ केली. इतक्यावरच न थांबता शिंगे याने महिलेसा साहेबांनी बोलावल्याचे सांगत पोलिस चौकीत बोलावून बेदम मारहाण केली. या मारहाणीत महिलेच्या डोळ्याला आणि डोक्याला जबर मार लागला होता. मारहाणीमुळे महिला बेशुद्ध झाल्या होत्या.
या घटनेची दखल घेत पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कारवाई करण्याच्या सूचना पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना दिल्या होत्या. पोलिस कर्मचाऱ्याने महिलेस पोलिस चौकीत बोलवून मारहाण केल्यानंतरही शिंगे विरुद्ध तक्रार घेण्यासही विश्रामबाग पोलिसांकडून टाळाटाळ करण्यात आली. पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता व पोलिस उपायुक्त डॉ.प्रियंका नारनवरे यांच्यापर्यंत गेल्यानंतर 15 दिवसांनी शिंगेविरुद्ध गुन्हा दाखल केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.