Ravindra Dhangekar News : पोलिस आयुक्त, ससूननंतर आता आमदार धंगेकरांचा मोर्चा पुणे विद्यापीठाकडे, कुलगुरूंना भरला दम

Mla Dhangekar Visite Pune University : बांधकाम व्यावसायिकाच्या अल्पवयीन मुलाने भरधाव वेगाने पोर्श गाडी चालवून दुचाकीला धडक दिली. यामध्ये दुचाकीवरुन जाणाऱ्या दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. नियमांचे उल्लंघन करून शहरातील परमिट रुम, बार, पब रात्रभर सुरु असतात. यामध्ये कॉलेजमध्ये शिक्षण घेत असलेली तरुणाई बेभान होऊन सहभागी होते.
Ravindra Dhangekar- suresh Gosavi
Ravindra Dhangekar- suresh GosaviSarkarnama

Pune News : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परिसरात असलेल्या वसतीगृहामध्ये गांजा सापडल्याचे प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणांमध्ये अद्याप कोणाच्याही विरोधात गुन्हा दाखल झालेला नाही. या प्रकरणी तातडीने गुन्हा दाखल करावा, अशी मागणी मंगळवारी काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर आणि शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केली. याबाबतचे निवेदन देखील या दोन्ही नेत्यांनी पुणे विद्यापीठामध्ये जात कुलगुरूंना दिले आहे.

विद्येचे माहेरघर, सांस्कृतिक राजधानी अशी ओळख पुणे शहराची आहे. याच विद्येच्या माहेरघरातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारात काही दिवसांपूर्वी गांजा सापडल्याचे समोर आले होते. मात्र या प्रकरणात पुणे विद्यापीठाकडून अद्यापही कोणतीही तक्रार दाखल झालेली नाही. गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरात ड्रग्ज माफियांची काही प्रकरणे देखील समोर आलेली आहे. शहरातील काही शैक्षणिक संस्थांमध्ये ड्रग्ज, मद्य हे सर्रासपणे उपलब्ध होत असल्याचे दिसून आले आहे. या पार्श्वभूमीवर आमदार रविंद्र धंगेकर यांनी पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. सुरेश गोसावी यांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Ravindra Dhangekar- suresh Gosavi
Pune Accident Porsche : पोर्श कारमधील 'तो' दुसरा मुलगा कोण ? अपघात होऊन दहा दिवसानंतरही माहिती गुलदस्त्यातच !

पुणे शहरातील कल्याणीनगर भागात दहा दिवसांपूर्वी मध्यरात्री एक भीषण अपघात झाला होता. बांधकाम व्यावसायिकाच्या अल्पवयीन मुलाने भरधाव वेगाने पोर्श गाडी चालवून दुचाकीला धडक दिली. यामध्ये दुचाकीवरुन जाणाऱ्या दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. नियमांचे उल्लंघन करून शहरातील परमिट रुम, बार, पब रात्रभर सुरु असतात. यामध्ये कॉलेजमध्ये शिक्षण घेत असलेली तरुणाई बेभान होऊन सहभागी होते. ड्रग्जच्या आहारी जाणाऱ्या तरुणांची संख्या वाढत असून पोलिस (Police) आणि राज्य उत्पादन शुल्क विभाग याकडे डोळेझाक करत असल्याचा आरोप आमदार धंगेकर यांनी केला आहे.

दहा दिवसांपूर्वी कल्याणीनगर येथील अपघातातील अल्पवयीन आरोपीला वाचविण्यासाठी ससून मधील डॉक्टरांनी त्याचे ब्लड सॅम्पल बदलले असल्याची धक्कादायक माहिती देखील समोर आली होती. याविरोधात आमदार धंगेकर, शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी पोलिस आयुक्तासह राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिक्षकांना धारेवर धरले होते.

पुणे (Pune) विद्यापीठाच्या आवारात देखील गांजा तसेच अंमली पदार्थ मिळत असल्याचे प्रकार समोर आल्याने आमदार धंगेकर यांच्यासह अंधारे यांनी कुलगुरु डॉ. गोसावी यांची भेट घेतली. यावेळी आमदार धंगेकर यांनी कुलगुरु गोसावी यांना कडक शब्दात सुनावत गांजा प्रकरणाचा जाब विचारला.

धंगेकर म्हणाले, माझी प्रेमाची भाषा आहे. पण हा.. मी गप्प बसणार नाही. गांजा प्रकरणांमध्ये तातडीने कारवाई झाली पाहिजे. तुमचा माझा काय बांधाला बांध नाही.पण आम्ही तुमच्या तोंडाला काळं फासलं असं समजा. तुमच्या मुला बाळांना कुटूंबाला तुमच्या तोंडाला काळं फासलेलं बघायचंय का? मुलांनी विचारलं का काळं फासलं तर त्यांना उत्तर देता आलं पाहीजे, अशा शब्दात धंगेकरांनी कुलगुरुंना दम भरला. गांजा प्रकरणात आज गुन्हा दाखल झाला पाहिजे. तुम्ही तुमच्या खुर्चीला न्याय देत नाही, असेही धंगेकर म्हणाले.

Ravindra Dhangekar- suresh Gosavi
Porsche Hit And Run Case : चौकशी समिती म्हणजे 'उंदराला मांजराची साक्ष', माजी आयएएस अधिकारी झगडेंचा गंभीर आरोप !

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com