Vasant More - ''बंगाली बाबाकडून 15 लाखांत अघोरी पूजा''; तात्यांनी सांगितली राजकारण्यांच्या कर्मकांडाची 'इनसाइड स्टोरी'

Vasant More on Bharat Gogawale - जर तुम्ही ते व्हिडिओ अघोरी पुजेचे नाहीत असं म्हणत असाल, तर मग ते डिलीट करायला का लावले? असा सवालही मोरेंनी उपस्थित केला आहे.
Vasant More On Bharat Gogawale .jpg
Vasant More On Bharat Gogawale .jpgSarkarnama
Published on
Updated on

Vasant More, Bharat Gogawale and Aghori puja :  शिवसेनेचे आमदार असलेले भरत गोगावले यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी केलेली पूजा सध्या चर्चेत आहे. सुरुवातीला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पुण्यातील नेते वसंत मोरे यांनी याबाबतचा एक व्हिडिओ माध्यमांमध्ये शेअर करत ही आघोरी पूजा असल्याचं सांगितलं होतं.

त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते सुरज चव्हाण यांनी देखील भरत गोगावले यांचा दुसरा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामुळे सध्या राजकारणांकडून अशा पद्धतीच्या पूजा करण्यात येतात का आणि त्या पूजा नेमक्या असतात तरी काय? असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. याबाबत खुद्द वसंत मोरे यांनी काही खळबळजनक माहिती दिली आहे.

वसंत मोरे म्हणाले,  'काही राजकारणी लोकांकडे मोठ्याप्रमाणात पैसा आला आहे. त्याच पैशाच्या माध्यमातून कर्मकांड आणि अघोरी प्रकार घडत असल्याचे पाहायला मिळत आहे. हे अघोरी प्रकार मोठ्या प्रमाणात खर्चिक असतात त्यासाठी दहा-पंधरा लाखांचा खर्च येतो. हे ऐकलं तरी प्रश्न पडतो. आपल्याकडे जर एवढे दहा-पंधरा लाख असतील तर आपण त्या माध्यमातून आणखी गरजू लोकांची मदत करू शकेल असं वाटतं.'

Vasant More On Bharat Gogawale .jpg
Shashi Tharoor - 'पक्षासोबत माझे काही मतभेद आहेत आणि मी..' ; शशी थरूर यांचं काँग्रेसबाबत मोठं विधान!

तसेच 'मात्र सध्याची मोठमोठी दुकान उघडली गेली आहेत.  त्या दुकानांमध्ये या कर्मकांडाच्या माध्यमातून पैसा जातो. पंधरा लाख रुपये एखाद्या पूजेसाठी घेतले जातात. खरंतर हे पैसे नेते लोक त्यांच्या मतदारसंघातील गरजू विद्यार्थ्यांची फी भरण्यासाठी, एखाद्या रुग्णाच्या उपचाराचा खर्च भागवण्यासाठी करू शकतात, मात्र तसं न करता निवडणुका आल्या की कर्मकांडाचे प्रकार केले जातात.' असं वसंत मोरे म्हणाले.

याशिवाय 'भरत गोगावले यांचा जो दुसरा व्हिडिओ समोर आला आहे. त्या व्हिडिओमध्ये ते बंगाली बाबा सोबत दिसत आहेत. सुरुवातीला बगलामुखी मंदिरातील आणलेल्या लोकांसोबत त्यांनी पूजा केल्याचं पाहायला मिळालं. नव्याने समोर आलेल्या व्हिडिओमध्ये ते बंगाली बाबा समोर अर्धनग्न अवस्थेत बसले आहेत. या सर्व गोष्टी अघोरी आहेत. आम्ही देखील मंदिरामध्ये पूजा,यज्ञ करत असताना आहुती देतो. ती आहुती अग्निला अर्पण केली जाते. मात्र ज्या पद्धतीने भरत गोगावले पूजा करताना दिसत आहेत, ती आघोरी पद्धत असून एखाद्याचं वाटोळ करण्यासाठी अशा पद्धतीची पूजा केली जाऊ शकते.' असंही  वसंत मोरे यांना बोलून दाखवलं.

Vasant More On Bharat Gogawale .jpg
Ashadhi Wari route : वारी मार्गावरील हॉटेल्स, ढाब्यांवर वारीच्या कालावधीत मद्य अन् मांसविक्रीस पूर्णतः बंदी!

याचबरोबर, 'भरत गोगावले यांच्याबाबतचा जो पूजेचा  व्हिडिओ मी व्हायरल केला. तर इथपासून ते मध्यप्रदेशपर्यंत आग लागली आहे. जिथून ते व्हिडिओ माझ्यापर्यंत आले होते ते सर्व व्हिडिओ त्यांच्या फेसबुक अकाउंट वरून डिलीट करण्यात आले आहेत. जर तुम्ही ते व्हिडिओ अघोरी पुजेचे नाहीत असं म्हणत असाल, तर मग ते डिलीट करायला का लावले?' असा सवालही वसंत मोरे यांनी उपस्थित केला. एवढंच नाहीतर, आमच्याकडे अजूनही काळी हळद, पिवळी हळद याबाबतचे देखील विषय आहेत, वेळ पडल्यास ते देखील बाहेर काढणार असल्याचा इशाराही वसंत मोरे यांनी दिला.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com