Dattatray Bharane : कोकाटेंची कमतरता भरणेंनी 24 तासांच्या आत भरून काढली; महसूल अधिकाऱ्यांसमोरच म्हणाले, वाकडं काम करून...

Controversial Remark by Agriculture Minister Dattatray Bharane : इंदापुरात शुक्रवारी महसूल दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात दत्तात्रय भरणे यांनी महसूल अधिकाऱ्यांसमोरच हे विधान केले आहे.
Dattatray Bharne
Dattatray BharneSarkarnama
Published on
Updated on

Comparison Drawn with Manikrao Kokate's Legacy : महायुती सरकारमधील काही मंत्र्यांच्या अजब, वादग्रस्त विधानांमुळे मागील काही दिवसांपासून महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघत आहे. त्यामध्ये माणिकराव कोकाटे आघाडीवर होते. त्यातच त्यांचे विधिमंडळातील रमी प्रकरण बाहेर आल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला. अखेर त्यांची कृषिमंत्रिपदावरून उचलबांगडी करण्यात आली अन् हे खातं दत्तात्रय भरणे यांच्याकडे देण्यात आले. पण त्यांनीही 24 तासांच्या आत कोकाटेंची कमतरता भरून काढली आहे.

दत्तात्रय भरणे हे गुरूवारी सायंकाळपर्यंत राज्याचे क्रिडा व युवक कल्याण मंत्री होते. रात्री उशिरा त्यांचे आणि कोकाटेंची मंत्रिपदाची अदलाबदली झाल्याची अधिसूचना धडकली. आता भरणे राज्याचे कृषिमंत्री बनले असून ज्येष्ठ नेते कोकाटेंकडे क्रिडा खाते गेले आहे. रमी प्रकरणाआधी कोकाटेंची अनेक विधाने वादग्रस्त ठरली होती.

कृषिमंत्रिपद मिळाल्यानंतर कोकाटेंचं पहिलंच विधान होतं, हे मंत्रिपद म्हणजे ओसाड गावची पाटीलकी. त्यानंतर वादग्रस्त विधानांची जणू रांगच लागली. आता नवे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनीही अजब विधान करत आपल्या कृषिमंत्रिपदाची कारकीर्द सुरू केली आहे. त्यांचा मतदारसंघ असलेल्या इंदापुरात महसूल दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांनी महसूल अधिकाऱ्यांसमोरच हे विधान केले आहे.

Dattatray Bharne
RahuI Gandhi : आमच्याकडे अ‍ॅटम बॉम्ब, तो फुटला तर..! राहुल गांधींनी वात पेटवली, महाराष्ट्राबाबत लवकरच करणार मोठा धमाका?

काय म्हणाले भरणे?

कार्यक्रमात बोलताना भरणे म्हणाले, नियमानेच वागावे लागते. शेवटी हे लक्षात ठेवा की, या जगात प्रत्येकाला संकटं आहेत. प्रत्येकाला अडचणी आहेत. हे स्पर्धेचे युग आहे. तुम्हाला वाटते हे असंच का तसंच का? पण आपण जर लोकांना मदत केली तर त्याचा फायदा निश्चितपणे आपल्याला होतो.

Dattatray Bharne
Maharashtra Elections : महाराष्ट्रातील 10 विधानसभेतील EVM तपासणीने आघाडीला धक्का; आयोगाने छातीठोकपणे दिला 'रिझल्ट'

तुम्हा सगळ्यांना माहिती आहे. तुमच्यासमोर मी उभा आहे. कारखान्याचा संचालक असताना काम जर मी... सरळ काम तर सगळेच करतात, पण एखादं असं वाकडं करून पुन्हा नियमांत बसवणारं काम जे करतात त्याची माणसं नोंद ठेवतात, असे अजब विधान भऱणे यांनी केले आहे. भरणे यांनी एकप्रकारे वाकडे काम करून पुन्हा ते सरळ करण्याचा सल्लाच अधिकाऱ्यांना दिल्याची चर्चा राजकीय वर्तूळात सुरू झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com