Supriya Sule: हनुमंत कोकाटेंवर गुन्हा दाखल करा! सुप्रियाताईंच्या मागणीनंतर भरणे मामा मैदानात

Dattatray Bharne: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे इंदापूर तालुका कार्याध्यक्ष महारुद्र पाटील यांना दत्तात्रय भरणे यांचे समर्थक असलेल्या हनुमंतराव कोकाटे यांनी यांना ऑन कॅमेरा धमकी दिली आहे.
Dattatray Bharne
Dattatray BharneSarkarnama
Published on
Updated on

Summary

  1. धमकीचा गंभीर आरोप: इंदापूरमध्ये अजित पवार गटाचे हनुमंत कोकाटे यांनी शरद पवार गटाचे महारुद्र पाटील यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप झाला आहे.

  2. सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया: सुप्रिया सुळे यांनी यावर तीव्र प्रतिक्रिया देत पोलिसांकडे गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

  3. भरणे यांचे स्पष्टीकरण: कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी कोकाटे यांच्या वक्तव्याचा गैरअर्थ काढला गेला असावा, असे सांगून त्यांचे समर्थन केले.

Pune News :राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे इंदापूर तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कार्याध्यक्ष महारुद्र पाटील यांना धमकी दिल्याचा गंभीर आरोप झाला आहे. कोकाटे हे दत्तात्रेय भरणे यांचे निकटवर्ती असल्यासचे सांगत खासदार सुप्रिया सुळे यांनी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. या आरोपांना भरणे यांनी देखील उत्तर दिले आहे.

नुकतेच कृषिमंत्री झालेले दत्तात्रय भरणे यांच्याशी जर कोणी संवाद साधला, तर "हाताखालून काढीन," अशा शब्दांत कोकाटे यांनी महारुद्र पाटील यांना धमकावले असल्याचं सांगितलं जात आहे. यामुळे दोन्ही राष्ट्रवादीतील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर आला आहे.

कोकाटे यांनी धमकावल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या, राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांचे समर्थक हनुमंतराव कोकाटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे इंदापूर तालुका कार्याध्यक्ष महारुद्र पाटील यांना जीवे मारण्याची धमकी दिली. सत्तेचा पाठिंबा असल्याशिवाय या पद्धतीने सराईतासारखी जाहीर धमकी देण्याचे धाडस कोणताही जबाबदार राजकीय नेता करु शकणार नाही. महारुद्र पाटील हे एक जबाबदार पदाधिकारी असून गेली अनेक वर्षे ते राजकारण तथा समाजकारणात सक्रिय आहेत," असे सुळे म्हणाल्या.

त्यांना 'ऑन कॅमेरा' धमकी देण्याचे धाडस करणाऱ्या कोकाटेंवर गुन्हा दाखल होण्याची गरज आहे. माझी पोलीस अधीक्षक, पुणे जिल्हा ग्रामीण यांना विनंती आहे की कृपया आपण या घटनेची गांभीर्याने दखल घ्यावी आणि संबधीत व्यक्तीवर गुन्हा दाखल करावा, असे यांनी सांगितले.

Dattatray Bharne
Sarkarnama Exclusive Interview: मुन्ना-बंटींची दोस्ती का तुटली? सतेज पाटलांनी सांगितली दोस्तीतल्या दुश्मनीची गोष्ट

"याबाबत मला जास्त माहिती नाही परंतु अशा प्रकारची कोणीही दमबाजी करणार नाही. त्यांच्या बोलण्याचा वेगळा अर्थ निघाला असावा . ग्रामीण बोलीभाषेमध्ये माणूस बोलून जातो आणि त्याचा वेगळा अर्थ काढला जातो. हनुमंतराव कोकाटे यांच्या बोलण्याचा जो अर्थ काढला जात आहे, तो तसा नसावा. हनुमंतराव कोकाटे यांना मी जवळून ओळखतो, ते तसे बोलणार नाहीत," असे भरणे म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com