Ajit Pawar: राज ठाकरेंच्या मिमिक्रीवर अजित पवारांचं भन्नाट उत्तर, म्हणाले, माझ्या अंगाला...

Ajit Pawar: राज्य निवडणूक आयोगासोबत बैठक झाल्यानंतर महाविकास आघाडीमधील प्रमुख नेत्यांसह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं संयुक्त पत्रकार परिषद घेतली.
Ajit Pawar on Raj Thackeray
Ajit Pawar on Raj ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Pune News: राज्य निवडणूक आयोगासोबत बैठक झाल्यानंतर महाविकास आघाडीमधील प्रमुख नेत्यांसह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं संयुक्त पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर आणि एकूणच निवडणूक प्रक्रियेवर सडकून टीका केली. तसेच विधानसभा निवडणुकीच्या निकालावरही त्यांनी जोरदार टीका केली. महायुतीने २३२ जागा जिंकल्या असल्या तरी, संपूर्ण महाराष्ट्रात एक प्रकारचा सन्नाटा पसरला होता. पराभूत झालेल्यांना धक्का बसतोच पण या निवडणुकीत विजयी झालेल्यांना सुद्धा धक्का बसला होता, हे असामान्य आहे, असे राज ठाकरे म्हणाले.

Ajit Pawar on Raj Thackeray
BMC Homes : मुंबईत माफक दरात घर घेण्याचं स्वप्न आहे? BMCच्या 426 फ्लॅट्सच्या विक्रीला 'या' दिवसापासून सुरुवात; 'असा' करा अर्ज

त्याचवेळी राज ठाकरेंना 'तुम्ही महाविकास आघाडीसोबत एकत्र दिसत आहात' असा प्रश्न विचारला असता, ते म्हणाले, "२०१७ सुद्धा मी हेच बोलत होतो, त्यावेळेस अजित पवार सुद्धा होते. खरं तर त्यांनी सुद्धा आज यायला हवे होते, त्यावेळेला ते तावातावाने बोलत होते" हे म्हणताना राज ठाकरे यांनी अजित पवारांची मिमिक्री केली. आता राज ठाकरे यांच्या या मिमिक्रीवर स्वतः अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

Ajit Pawar on Raj Thackeray
Hindi Ban Act: तामिळनाडूत आता हिंदी भाषेतील होर्डिंग्ज, सिनेमे, गाण्यांवरही कायद्यानं येणार बंदी? सरकार आणणार नवं विधेयक

पुण्यात आज माध्यमांशी बोलताना अजित पवार यांनी राज ठाकरे यांच्या मिमिक्रीवर उत्तर दिले आहे. ते म्हणाले, 'उद्या तू जरी माझी मिमिक्री केली तरी माझ्या अंगाला भोकं पडत नाहीत. मिमिक्री करणारे मिमिक्री करत राहतील मी कामाचा माणूस आहे. मी काम करत राहील. मी माझ्या शेतकऱ्यांकरता महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.

Ajit Pawar on Raj Thackeray
Bihar Election 2025: बिहारमध्ये भाजपची मोठी खेळी! 10 विद्यमानसह माजी आमदारांना दाखवला घरचा रस्ता; कारण जाणून घ्या

मिमिक्री कोण करतय हे आपण ओळखून घेतलं पाहिजे. उद्या तुम्ही उठून त्यांना विचारणार का ओ राजसाहेब ठाकरे तुम्ही मिमिक्री केल्यावर अजित पवार असं-असं म्हणाले. मला याच्याशी घेणं देणं नाही. मला माझ्या बळीराजाला दिवाळीच्या पूर्वी ताबडतोब कशी मदत मिळेल, शेतकऱ्यांना पुन्हा कसं उभं करता येईल हे पाहायचं आहे. हे काम आम्ही करत आहोत आणि ते करत राहू' असं अजित पवार म्हणाले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com