Pune : आक्रोश मोर्चाची सांगत होत असताना शिवसेना (उबाठा) नेते संजय राऊत यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधला होता. अजित पवारांची नक्कल संजय राऊत यांनी आमच्या पाडापाडीत पडाल तर तुम्ही पडाल, असे म्हटले होते. शिवाय, 'हवा बहोत तेज चल रही है अजितराव (Ajit Pawar) टोपी उड जाएगी, असे म्हणत अजित पवारांची खिल्ली उडवली होती. त्यानंतर अजित पवार संजय राऊतांवर कठोर प्रहार करतील, अशी शक्यता होती. अजित पवारांनी एका वाक्यात संजय राऊतांचा विषय संपवला.
सोम्यागोम्यानं बोलल्यावर मी उत्तर देत नाही, असं म्हणत अजित पवार यांनी संजय राऊतांना महत्त्व देणंच टाळलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली महायुती लोकसभेत चांगले यश मिळवेल, असं देखील अजित पवार म्हणाले.
राष्ट्रवादीच्या आक्रोश मोर्चामध्ये खासदार अमोल कोल्हे, खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील अजित पवारांवर जोरदार टीका केली. अजित पवार महायुतीत गेल्याने त्यांची अवस्था सर्कशीतील वाघासारखी झाली असल्याची टीका सुप्रिया सुळेंनी केली होती. याच सभेत शिवसेना नेते संजय राऊत यांनीही अजित पवारांची नक्कल करत खिल्ली उडवली होती. मात्र, अजित पवार यांनी संजय राऊतांवर बोलण्याचं टाळून त्यांना अजिबात महत्त्व देत नसल्याचे दाखवले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी सोमवारी सकाळी पेरणेफाटा येथील ऐतिहासिक विजयस्तंभास अभिनवादन केले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पेरणेफाटा येथील विजयस्तंभास अभिवादन सोहळ्याच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने उत्तम व्यवस्था केल्याबद्दल जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांचा सत्कार करण्यात आला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.