Rupali Chakankar : अजितदादांचे शिक्षण काढणाऱ्यांना दमानियांना रुपाली चाकणकरांचे प्रत्युत्तर, 'ती' भावूक करणारी घटना सांगितली

Rupali Chakankar Slams Anjali Damania: आपले अर्थमंत्री दहावी पास देखील नाही, अशी टीका अंजली दमानिया यांनी केली होती. या टीकेला दमानियांचे नाव न घेता रुपाली चाकणकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
Ajit Pawar, Rupali Chakankar & Anjali Damania
Ajit Pawar, Rupali Chakankar & Anjali Damaniasarkarnama
Published on
Updated on

Rupali Chakankar News : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पुण्यामधील एका कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना अजित पवारांवर टीका केली होती. आपले सध्याचे अर्थमंत्री दहावी पास असून त्यांना काहीच कळत नाही, असे त्यांनी म्हटले. अजित पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दमानियांचे नाव न घेता जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

'एक्स'वर (पूर्वीचे ट्विटर) पोस्ट करत चाकणकर म्हणाल्या आहेत की, 'आदरणीय अजितदादा पवार यांच्या वडिलांचे हृदय विकाराने दुःखद निधन झाले. त्या वेळी अजितदादा कोल्हापूर येथे शिक्षण घेत होते.वडिलांच्या निधनानंतर दादांनी शिक्षण अर्ध्यात सोडले.त्यामुळे कोणीही अजितदादा यांच्यावर या मुद्द्यावरून टीका टिप्पणी करावी असा हा विषय नसून ही त्यांच्या जीवनातील अतिशय संवेदनशील घटना आहे.'

'

'शिक्षण सोडून बारामतीमध्ये आल्यावर दादांनी शेती करायला सुरूवात केली, पोल्ट्री व्यवसाय वाढवला, वेगवेगळी पिके घेतली. मग त्यांनी राजकारणाचा मार्ग निवडला.गणितात अतिशय हुशार आणि इमारती, रस्ते, पूल आदींच्या बद्दल इंजिनियरला लाजवेल असा अभ्यास असणारे अजितदादा आहेत.', असे देखील त्यांनी सांगितले.

Ajit Pawar, Rupali Chakankar & Anjali Damania
Minatai Thackeray Statue Video : मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणाऱ्याला अटक; ठाकरेंच्या कार्यकर्त्याच्या भावाचे कृत्य, स्वतः दिली कबुली

'त्यांचा दृष्टिकोन हा काळाच्या पुढे बघण्याचा कायम राहिलेला आहे. शिक्षण आणि कृषी क्षेत्रात एआय वापरण्यासाठी आग्रही असणारे अजितदादा पवार आहेत. त्यांना भविष्याचा अचूक वेध घेता येतो तो त्यांच्या अभ्यासू आणि चौकस दृष्टीकोनामुळेच.', असे देखील चाकणकर म्हणत होते.

दमानिया नेमकं काय म्हणाल्या?

अजित पवारांना काहीच कळत नाही. महाराष्ट्र कर्जात बुजाला आहे. राज्यावर सव्वा नऊ लाख कोटींचं कर्ज आहे. अर्थमंत्री दहावी पास असून त्यांना काहीच कळत नाही. असेट काय आहेत लायबिलिटीज काय आहेत, एवढे नऊ लाख कोटी आपण आणार कुठे आहोत?, असे अंजली दमानिया यांनी म्हटले होते.

Ajit Pawar, Rupali Chakankar & Anjali Damania
Ravindra Dhangekar on Chandrakant Patil : शिंदेंच्या सल्ल्यानंतरही; धंगेकरांचा चंद्रकांतदादांवर थेट हल्ला, म्हणाले,' माझ्यावर मकोका..'

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com