Meenatai Thackeray Statue Uddhav Thackeray
Meenatai Thackeray Statue Uddhav Thackeraysarkarnama

Minatai Thackeray Statue Video : मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणाऱ्याला अटक; ठाकरेंच्या कार्यकर्त्याच्या भावाचे कृत्य, स्वतः दिली कबुली

Uddhav Thackeray Upendra Pawaskar Arrested : दादारमधील मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर लालरंग टाकण्यात आला होता. पुतळ्याच्या विटंबना करणाऱ्याला पोलिसांनी 24 तासांच्या आता अटक केली आहे.
Published on

Mumbai News : उद्धव ठाकरेंच्या मातोश्री दिवंगत मीनाताई ठाकरे यांच्या दादरमधील पुतळ्यावर लाल रंग टाकण्यात आल्याने शिवसैनिक, मनसे कार्यकर्ते संतप्त झाले होते. मंगळवारी रात्री ही घटना घडली होती. बुधवारी स्वतः राज ठाकरे यांनी घटनास्थळी भेट देत आरोपीला अटक करण्याची मागणी केली होती. सर्व सीसीटिव्ही तपासण्याच्या सूचना देखील करण्यात आल्या होत्या. या प्रकरणानंतर दादर परिसरात तणाव होता. दरम्यान, पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

उपेंद्र गुणाजी पावसकर असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तो ठाकरेंच्या कार्यकर्त्यांचा चुलत भाऊ असल्याचे सांगितले जात आहे. आरोपीने कबुली देताना सांगितले की, संपत्तीच्या वादात उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे हस्तक्षेप करत होते. वारंवार आपण पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी जात होतो मात्र आपली तक्रार घेतली जात नव्हती असे देखील आरोपीने सांगितले.

दरम्यान, शिवसैनिकांनी सांगितले की, ही घटना मंगळवारी रात्री घडली होती. कोणीतरी हे कृत्य केले होते. पण पण ही बाब लक्षात आल्यानंतर पुतळ्याच्या आणि चबुतऱ्याच्या स्वच्छतेचं काम हाती घेण्यात आले. मंत्री शंभूराज देसाई यांनी देखील घटनास्थळी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला होता.

Meenatai Thackeray Statue Uddhav Thackeray
Beed Railway Project: बीडच्या रेल्वेला 'राजकीय इंजिन'; श्रेयवादावरून मुख्यमंत्र्यांसमोरच जोरदार खडाजंगी

उद्धव ठाकरे यांनी घटनास्थळी भेट दिल्यानंतर सांगितले होते की, ज्याला आपल्या आई-बापाचं नाव घेण्याची लाज वाटते आणि जो कोणी लावारिस असेल त्यानंच हा प्रकार केला असेल. शिवसैनिकांच्या भावना तीव्र असल्या तरी आम्ही सर्वांना शांत राहण्याचं आवाहन केले आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील पुतळ्याच्या विटंबनेच्या घटनेनंतर संताप व्यक्त केला होता. हे कृत्य करणाऱ्याला सोडणार नसल्याचे त्यांनी म्हटले होते तसेच या घटनेची दखल मुख्यमंत्र्यांनी घेतल्याचे आणि आपण पोलिस आयुक्तांशी या घटनेसंदर्भात बोललो असल्याचे त्यांनी सांगितले होते.

Meenatai Thackeray Statue Uddhav Thackeray
Bajrang Sonwane On Hake: 'लक्ष्मण हाकेंना बीडमधून निवडणुक लढवायची...' ; खासदार बजरंग बाप्पा सोनवणे यांचं मोठं विधान

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com