

Pune News : महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून भाजपच्या स्थानिक नेत्यांवर हल्लाबोल केला जात असल्याचे पाहायला मिळत आहे. पुण्यातील त्रिकूट म्हणत अप्रत्यक्षपणे यापूर्वी देखील अजित पवार यांनी खासदार मुरलीधर मोहोळ, मंत्री चंद्रकांत पाटील आणि माजी सभागृह नेते गणेश बिडकर यांच्यावर निशाणा साधला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा अजित पवार यांनी स्थानिक आणि बाहेरचा मुद्दा उपस्थित करत चंद्रकांत पाटील यांच्यावर प्रत्यक्षपणे हल्लाबोल केला आहे.
पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी बाणेर परिसरात आयोजित सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपच्या स्थानिक नेतृत्वावर जोरदार टीका केली. थेट नाव न घेता भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधत त्यांनी पुणेकरांना आवाहन केले की, "पुणे तुमचं आमचं आहे, बाहेरची लोक येतील आणि जातील, आपली माणसं ओळखा, आपली लोक पहा."
अजित पवार यांनी पुण्यातील वाहतूक कोंडी, खड्डे, कचरा व्यवस्थापन, पाणीटंचाई आणि कायदा-सुव्यवस्थेच्या बिघडलेल्या स्थितीला विद्यमान महापालिका कारभाऱ्यांना जबाबदार धरले. अजित पवार म्हणाले, "केंद्र आणि राज्य सरकारने पुण्याला भरभरून निधी दिला आहे, पण कारभारी कमी पडले. मला कारभारी करा, मी शब्द देतो, पुण्याचा चेहरामोहरा बदलून टाकेन."
भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना पक्षाने बाजूला केल्याचा आरोप करत पवार म्हणाले, "ज्या भाजप कार्यकर्त्यांनी जीवाचं रान करून पक्ष वाढवला, त्यांना खड्यासारखे बाजूला टाकता येत नाही." याच सभेत अमोल बालवडकर यांनीही चंद्रकांत पाटील यांच्यावर भावनिक हल्ला चढवला आणि अपमानाचा बदला निवडणुकीत घेण्याचा शब्द दिली.
महायुतीत असूनही पुणे-पिंपरीत वेगळे चित्र असल्याचे सांगत अजित पवार यांनी पुण्याच्या नेतृत्वाची कमतरता असल्याचा टोला लगावला. या निवडणुकीच्या अनुषंगाने अजित पवार यांनी भाजप नेतृत्वाला डिवचले असताना आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुण्यामध्ये प्रचार सभा घेणार आहे यामध्ये ते काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.