जो आडवा येईल त्याला सरळ उचला; अजितदादांचा पोलिसांना आदेश

Ajit Pawar Latest News : काटेवाडीमध्ये अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज एक तास राष्ट्रवादीसाठी (Ncp) या उपक्रमाखाली वेळ दिला.
Ajit Pawar News
Ajit Pawar Newssarkarnama
Published on
Updated on

बारामती : आपल्या रोखठोक शैलीसाठी प्रसिध्द असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज पुन्हा एकदा आपल्या सडेतोड स्वभावाचे दर्शन घडविले. बारामतीत अनेक नागरिक त्यांना विविध कामे घेऊन भेटत असतात. एकाने जागेची मोजणी सुरु असलेली बाब निदर्शनास आणून देत तक्रार केली. दोन गटात वाद आहेत, त्या मुळे समोरचा ऐकतच नाही, असे त्याने पवार यांना सांगितले. (Ajit Pawar Latest News)

ऐकत नाही म्हटल्यावर अजित पवारांनी थेट डीवायएसपी गणेश इंगळे यांना बैठक घेऊन तडजोड होतीय का ते पाहा, नाही तर मग जो आडवा येईल त्याला सरळ उचला मग तो अजित पवार का असेना...असे आदेशच देऊन टाकले.

काटेवाडीमध्ये अजित पवार यांनी आज एक तास राष्ट्रवादीसाठी (Ncp) या उपक्रमाखाली वेळ दिला. अनेकांनी या वेळी विविध तक्रारी त्यांच्यापुढे मांडल्या. पालखी मार्गाबाबत चर्चा सुरु असतानाच एकाने तर थेट एका वरिष्ठ अधिका-याचे नाव घेऊनच दोन टक्के कमीशन घेत असल्याचे सांगितल्यानंतर पवारही अवाक झाले.

जाहिरपणे अजित पवार या बाबत काही बोलले नसले तरी त्यांच्यापर्यंत जायचा तो संदेश गेलेला असून ते या बाबत योग्य ती कार्यवाही करतील अशी चर्चा काटेवाडीच्या ग्रामस्थांमध्ये होती. स्वत: दादांनीच तासभर वेळ दिल्यामुळे आज ग्रामस्थ समाधानी होते. अनेकांची कामे अजित पवार यांनी आज मार्गी लावून दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com