छत्रपती कारखान्याच्या निवडणुकीनंतर आता बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक रंगणार आहे. (Malegaon Sugar Factory Election) बारामतीच्या राजकारणात महत्वाची ठरणाऱ्या माळेगावच्या निवडणुकीसाठी आज खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दंड थोपटलं आहे.
ब वर्ग संस्था मतदार संघातून अजितदादांनी आपली उमेदवारी जाहीर केली आहे. पवार हे स्वतःच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पॅनेलमध्ये सहभागी होतात का हा खरा उत्सूकतेचा विषय झाला आहे. तसे झाल्यास पक्षाच्या पॅनेलला खूपच वजन प्राप्त होणार असल्याचे मानले जाते.
माळेगाव कारखाना निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी २०० इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. या निवडणूक प्रक्रियेत एकूण ५९३ उमेदवारी अर्ज बारामती निवडणूक कार्यालयात प्राप्त झाले आहेत.
अजित पवार (ब वर्ग मतदार संघ)
बाळासाहेब तावरे (माळेगाव गट)
केशवराव जगताप, राजेंद्र जगताप (पणदरे गट)
अनिल तावरे, प्रकाश तावरे (सांगवी)
सतिश तावरे ( माळेगाव)
रामदास आटोळे (खांडज गट)
पोपटराव गावडे (बारामती)
सहा गटातून शेवटच्या दिवशी मंगळवारी दोनशे, तर एकूण ५९३ उमेदवारी अर्ज दाखल झाले.
माळेगाव गटातून आजवर ५१ , पणदरे गटातून ७९
सांगवी गटातून ५४ , खांडज-शिरवली गटातून ६६
नीरावागज येथून ५९, बारामती गटातून ७९
महिला राखीव मतदार संघातून ६८
अनुसूचित जाती-जमाती मधून २०
भटक्या जातीमधून ६४
इतर मागास प्रवर्गातून २५ ब वर्ग संस्था मतदार संघातून २८ उमेदवारी अर्ज आजवर दाखल झाले आहेत.
बाळासाहेब तावरे (वय ८३) यांनी सुमारे २८ वर्षे कारखान्याच्या संचालकपदावर काम केले, तर अध्यक्षपदावर ते जवळपास १७ वर्षे कार्यरत असल्याची नोंद आहे.
केशवराव जगताप (वय ७८) हे दोन वर्षापासून अध्यक्षपदावर काम करीत आहेत, तर त्यांना संचालकपदाचा १७ वर्षांचा अनुभव आहे.
राजेंद्र जगताप यांना माळेगाव कारखान्यात अधिकारी म्हणून ३६ वर्षे काम केल्याचा अनुभव आहे. त्यामध्ये कार्यकारी संचालक म्हणून जगताप हे तीन वर्षे कार्यरत राहिले.
विरोधी गटाचे प्रमुख व उमेदवार चंद्रराव तावरे (वय ८५) हे ४५ वर्षांपासून ( १९८०) माळेगाव कारखान्याच्या राजकारणाशी संलग्न आहेत.
रजंन तावरे (वय ७२) हे जवळपास तीस वर्षांपासून कारखान्याच्या राजकारणात सक्रिय आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.