Sharad Pawar News : लोणावळ्यातील कार्यकर्ते 'घड्याळ' काढून वाजवणार 'तुतारी', पवारांचं शिरूरनंतर आता मावळात लक्ष

Sharad Pawar In Lonavala| शरद पवार गुरुवारी लोणावळ्यात कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा घेणार आहेत.
sharad pawar
sharad pawarsarkarnama
Published on
Updated on

पक्षात स्थानिक पातळीवर पक्षात डावलले जात असल्याच्या नाराजीतून गुरुवारी ( 29 फेब्रुवारी ) राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोणावळ्यातील सव्वाशे कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिले होते. त्यात बहुतांश पदाधिकारी येत्या गुरुवारी ( 7 मार्च ) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार आहेत. हा राष्ट्रवादी काँग्रेसला मावळमध्ये मोठा धक्का आहे.

sharad pawar
Amol Kolhe News : "उमेदवारी देऊन चूक केली", अजितदादांच्या विधानावर कोल्हे प्रत्युत्तर देत म्हणाले, "10 वेळा..."

शरद पवार ( Sharad Pawar ) यांच्या उपस्थितीत लोणावळ्यात गुरुवारी सकाळी दहा वाजता होणाऱ्या पक्ष कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांच्या संवाद मेळाव्यात ही घरवापसी होणार आहे. मुंबईत शरद पवारांची भेट घेतल्यानंतर मावळ तालुका अध्यक्ष दत्तात्रेय पडवळ यांनी 'सरकारनामा'ला ही माहिती दिली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

गेल्या गुरुवारी राजीनामा दिलेले अजित पवार ( Ajit Pawar ) गटातील लोणावळा शहर युवक अध्यक्ष विनोद होगले यांनी काही समर्थकांसह पडवळांबरोबर शरद पवारांची भेट घेतली. विश्वासात न घेता पाच दिवसांपूर्वी होगलेंना तडकाफडकी पदावरून दूर केल्याने त्यांच्यासह इतरांनी हे सामूहिक राजीनाम्याचे हत्यार लगेच उपसले. जुन्या निष्ठावान कार्यकर्त्यांना विश्वासात घेतले जात नसल्याच्या कारणातून राजीनामे दिले. पक्ष हा कमर्शिअल लोकांच्या हातात गेल्याची खंत होगलेंनी व्यक्त केली होती.

sharad pawar
Eknath Shinde On Manoj Jarange : जरांगे-पाटील अजूनही नाराज का आहेत? मुख्यमंत्री उत्तर देत म्हणाले...

'सरकारनामा'चा अंदाज खरा ठरला

गेल्या आठवड्यात सामूहिक राजीनामा दिलेले बहुतांश कार्यकर्ते आणि पदाधिकारी हे राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून काम करीत होते. त्यामुळे ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची वाट धरतील, अशी शक्यता 'सरकारनामा'ने 29 फेब्रुवारी रोजी दिलेल्या वृत्तात व्यक्त केली होती. ती खरी ठरणार आहे. कारण, राजीनामा दिलेल्यांपैकी बहुतांश जण घरवापसीच करणार आहेत. म्हणजे ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार आहेत. "मूळ पक्षात आल्याचे समाधान आणि स्वाभिमान आहे," अशी प्रतिक्रिया होगलेंनी दिली.

sharad pawar
Chandrakant Patil On Mahadev Jankar : महायुतीच्या बैठकांना 'रासप'ला निमंत्रण का नाही? पाटील म्हणाले, "जानकर हे..."

दरम्यान, या मेळाव्यातून शिरूर, बारामतीनंतर शरद पवारांनी मावळ लोकसभेतही लक्ष घातल्याचे स्पष्ट झाले आहे. कारण हे मतदारसंघ त्यांच्या पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या पुणे जिल्ह्यात आहे. त्यामुळे आघाडीत भलेही जागा त्यांच्या पक्षाच्या वाट्याला नसली, तरी तेथील त्यांचा मित्रपक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या उमेदवारासाठी ताकद देण्यासाठी त्यांनी कंबर कसली आहे.

R

sharad pawar
Loksabha Election 2024 : देश कुणाच्या बापाचा नाही; राजू शेट्टी कडाडले, थेट भाजपला सुनावले

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com