Ajit Pawar : 'उमेदवार भेटला नाही की आम्ही कलाकाराला उभं करतो'; अजितदादांच्या टार्गेटवर पुन्हा अमोल कोल्हे ?

Lok Sabha Election 2024 : आगामी निवडणुकीत शिरूरमध्ये राष्ट्रवादीच्या दोन गटांतच चुरशीची लढत रंगण्याची चिन्हे दिसत आहेत. यातच अजित पवारांच्या टार्गेटवर अमोल कोल्हे असल्याचे दिसते.
Ajit Pawar and Amol Kolhe
Ajit Pawar and Amol KolheSarkarnama

Shirur Lok Sabha Constituency :

शिरूर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून विद्यमान खासदार अमोल कोल्हे पुन्हा रिंगणात उतरण्याची चर्चा आहे, तर महायुतीकडून अद्यापही उमेदवार कोण ? याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी खासदार अमोल कोल्हे यांना थेट आव्हान देत या वेळी 'आम्ही शिरूरला दिलेला उमेदवार निवडून आणणार म्हणजे आणणार', असं विधान केलं होतं. यानंतर अजित पवारांनी कोल्हेंच्या मतदारसंघात दौरेही वाढवल्याचे पाहायला मिळाले. (Marathi News)

आगामी निवडणुकीत शिरूरमध्ये राष्ट्रवादीच्या दोन गटांतच चुरशीची लढत रंगण्याची चिन्हे दिसत आहेत. यातच अजित पवारांच्या टार्गेटवर अमोल कोल्हे असल्याचे दिसते. आता अजितदादांनी पुन्हा एकदा खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना लक्ष्य करत मोठं विधान केलं आहे. "आम्हाला उमेदवार भेटला नाही की, आम्ही कलाकाराला उभं करतो, अमोल कोल्हे हेदेखील त्यापैकीच एक", असं अजितदादा म्हणाले. त्यांच्या या विधानाची चांगलीच चर्चा शिरूरमध्ये रंगली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Ajit Pawar and Amol Kolhe
Ajit Pawar: अरे बाबा झाली चूक, मला काय माहीत हा दिवटा असा उजेड पाडेल; अजितदादांनी अशोक पवारांची उडवली खिल्ली

अजित पवार नेमके काय म्हणाले ?

"आता त्यावेळी (2019 च्या निवडणुकीत) मी सांगितलं म्हणून तुम्ही अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांना निवडून दिलं, पण आता तो बाबा काही दिवसांनी राजीनामा द्यायचं म्हणाले होते. मी अभिनेता आहे. मला मतदारांना वेळ देता येईना. माझ्या क्षेत्रात माझं नुकसान व्हायला लागलं आहे. मुळात कोल्हे यांचं राजकारण हे पिंडच नाही. आम्हाला उमेदवार मिळाला नाही की आम्ही कलाकार पुढं आणतो. राजेश खन्ना, शत्रुघ्न सिन्हा, हेमा मालिनी, गोविंदा, अगदी अमिताभ बच्चनही निवडून आले आणि मग राजीनामा दिला.

पण त्यांना मतदारांचे काही पडलेलं नसतं. आपण राजबिंडा पाहून निवडून देतो. त्यात आमची चूक आहेच. मध्ये शिवनेरीवर मला खासदार अमोल कोल्हे भेटले. मी म्हटलं का ओ डॉक्टर, आधी राजीनामा द्यायचं म्हणत होते, आता परत दंड थोपटले. तर ते म्हणाले, हो दादा आता परत लढायची इच्छा झाली," असं सांगत अजित पवारांनी पुन्हा एकदा खासदार अमोल कोल्हेंवर निशाणा साधला.

Ajit Pawar and Amol Kolhe
Ajit Pawar: अमोल कोल्हेंच्या होमपीचवर आज अजितदादांची तोफ धडाडणार; 'हे' मुद्दे केंद्रस्थानी

कोल्हेंच्या नाट्य प्रयोगाबाबत अजित पवारांचं भाष्य

"नाट्य प्रयोगामधून अमोल कोल्हे हे वातावरण निर्मिती करत आहेत. मात्र, ही त्यांची तात्पुरती वातावरण निर्मिती आहे. लोकसभेच्या निवडणुकीवेळी खासदार कोल्हे म्हणतील आता यापुढं मी काम करेन. बघा आत्ताही त्यांचे नाटकाचे प्रयोग सुरू आहेत. त्यातून ते वातावरण निर्मिती करताहेत, ही तात्पुरती आहे. महाराजांचा इतिहास आपल्याला जपायचा आहे.

पण कोल्हे यांनी पाच वर्षे काय केलं ? याचाही विचार करा, असंही आवाहन अजित पवार यांनी केलं. खासदार कोल्हे कानात मला म्हणाले, दादा माझे नाटक आहे. मला नीलेश लंके यांच्या मतदारसंघात पोहोचायचे आहे. मी त्यांना म्हटलं अरे थांबा, तुम्हाला छत्रपती संभाजीराजे यांच्याकडे पाहून निवडून दिलंय. पण तरीही अमोल कोल्हे निघून गेले. त्या पाठोपाठ तुमचे आमदारही उठले. बाहेर जाऊन यांनी वेगळंच सुरू केलं", असं सांगत अजित पवारांनी खासदार कोल्हेंवर जोरदार निशाणा साधला.

आमदार अशोक पवारांना अजितदादांचा थेट इशारा

"घोडगंगा कारखाना चालवायला जमत नसेल, तर त्यांनी स्पष्ट सांगावं. मी त्यांना तसं आवाहन करतोय. त्यांनी सांगावं आपण नवी बॉडी आणू. वाटलं तर प्रशासक आणू. कारखाना चांगला चालायला हवा. शेतकऱ्यांची पिळवणूक होऊ नये. तुमचा कारखाना संकटातून बाहेर येऊ शकतो. फक्त तुम्ही साथ द्या. आत्ताचे आमदार (MLA) असे वागतील, असं वाटलं नव्हतं. आपला वेगळा फाटा आहे, त्यांचा वेगळा फाटा आहे. आजही लोकांच्या मनात शंका आहे. बरेच जण म्हणतात हे परत एकत्र येतील की काय ? अरे बाबांनो आता आमच्यात फाटलंय. उगाच मनात काही शंका ठेऊ नका", असं म्हणत अजित पवारांनी आमदार अशोक पवारांना (Ashok Pawar) थेट इशारा दिला.

"तुमच्या आमदाराने खासगी कारखाना व्यवस्थित चालवला, पण तुमच्या हक्काच्या कारखान्याची माती केली. तुम्ही म्हणाले, आता काय बोलताय, आधी मतं तुम्हीच द्यायला लावली. अरे हो की बाबा झाली चूक. मला काय माहिती हा दिवटा असा उजेड पाडेल. लोकसभेसाठी माणसातला माणूस उभा करणार आहे. तुम्ही एकदिलाने काम करा आणि त्या उमेदवाराला निवडून द्या," असा घणाघात अजित पवारांनी अशोक पवारांवर केला.

(Edited By-Ganesh Thombare)

R

Ajit Pawar and Amol Kolhe
NCP Political War : शिवसेनेनंतर राष्ट्रवादीतही बँक खात्यावरून संघर्ष; 'या' पक्षाचे बँकेला पत्र

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com